मुलींनो मित्रासोबत फिरायला जाताना सावध व्हा, पोलीस असल्याची बतावणी करत दोघांनी केला अत्याचार

बारावीमध्ये शिकणारी एक अल्पवयीन तरुणी शुक्रवारी डोंबिवलीला लागून असलेल्या ठाकुर्ली खाडी किनारा परिसरात आपल्या एका मित्रासोबत फिरायला गेली होती.यावेळी दोघे जण त्याठिकाणी आले. त्यांनी त्या तरुणी आणि तिच्या मित्राला आपण पोलीस असल्याचं सांगितले.

मुलींनो मित्रासोबत फिरायला जाताना सावध व्हा, पोलीस असल्याची बतावणी करत दोघांनी केला अत्याचार
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 2:10 PM

कल्याण : कल्याण आणि डोंबिवली (kalyan dombivli)शहरात गेल्या दोन वर्षात अत्याचारांच्या (Rape Case)घटनांमध्ये वाढ होत आहे. डोंबिवली आणि कल्याण ही दोन्ही शहरे यापुर्वी सामूहिक अत्याचाराच्या घटनेने हादरली होती. आता पुन्हा एकदा डोंबिवलीमध्ये अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विशेष बाब म्हणजे पोलीस (Police)असल्याची बतावणी करत दोघांनी अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने अत्याचार केला.

तोतयाने फसवले

बारावीमध्ये शिकणारी एक अल्पवयीन तरुणी शुक्रवारी डोंबिवलीला लागून असलेल्या ठाकुर्ली खाडी किनारा परिसरात आपल्या एका मित्रासोबत फिरायला गेली होती.यावेळी दोघे जण त्याठिकाणी आले. त्यांनी त्या तरुणी आणि तिच्या मित्राला आपण पोलीस असल्याचं सांगितले. इतकंच नाही तर तुम्ही इथे फिरताय? ही बाब तुमच्या पालकांना सांगत धमकवले.

हे सुद्धा वाचा

त्या दोघांना धमकवल्यानंतर त्या दोघांपैकी एक तरुण मुलीच्या मित्राला घेऊन स्टेशन परीसरात गेला. आमचे साहेब इथे बसले तू त्यांच्याशी बोल, अस सांगत त्याने तरुणाला गुंतून ठेवलं. दरम्यानच्या वेळात दुसरा आरोपी हा तरुणीला घेऊन काही अंतरावर गेला आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला.दुसरा आरोपीही मुलाला सोडून पुन्हा त्या ठिकाणी आला आणि त्यानेही मुलीवर अत्याचार केला.

पोलिसांनी नेमली पाच पथके

पीडीत मुलीने सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला.सुरवातीला रेल्वे पोलीसंकडे तक्रार करण्यात आली. मात्र नंतर हे प्रकरण शहर पोलिसांकडे येत असल्याने रात्री बारा वाजता विष्णूनगर पोलिसांकडे गेले. पोलिसांनी तपासासाठी पाच पथकं नेमली आहे. ठाकुर्ली खाडी किनारा, बावन चाळ परिसर निर्जन असल्याने तरुण तरूणीनी या ठिकाणी जाणं टाळावे, अशा भावना व्यक्त होत आहे. काही वर्षांपूर्वी बावन चाळ परीसरातही अशीच घटना घडली होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.