Farmer Loan Waiver: या बँकांकडून घेतलेले पीक कर्ज होणार माफ… या शेतकर्यांना फटका बसणार… मोठी अपडेट काय?
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026: शेतकरी कर्जमाफीचा मुहूर्त पुन्हा एकदा हुकला आहे. आता पुढील आठवड्यात तरी कर्जमाफी मिळणार की नाही याविषयी साशंकता आहे. दरम्यान या बँकांकडून घेतलेले पीक कर्ज माफ होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर या शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.

Farmer Loan Waiver Scheme Income Tax : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 चे मुहूर्त पुन्हा एकदा हुकला. पुढील आठवड्यात तरी सरकार कर्जमाफी करणार की नाही याची शाश्वती शेतकऱ्यांना नाही. सरकारकडून जोपर्यंत अधिकृत माहिती जाहीर करण्यात येत नाही, तोपर्यंत कर्जमाफीची प्रतिक्षाच शेतकऱ्यांच्या पदरी आहे. दरम्या या बँकांकडून घेतलेले पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. तर या शेतकऱ्यांना फटका बसणार असल्याचे समोर आले आहे.
व्याज वसूलीला स्थगिती
शेतकऱ्यांना तुर्तास सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत सरकारने एक मोठा धडाकेबाज निर्णय घेतला आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जोपर्यंत लाभाची रक्कम जमा होत नाही, तोपर्यंत थकीत पीककर्ज रक्कमेवर व्याज आकारणी करता येणार नाही. व्याज घेता येणार नाही असे स्पष्ट निर्देश सरकारने दिले आहेत. या योजनेत राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमुक्त देण्यात येणार आहे.
या बँकांकडून घेतलेले पीक कर्ज होणार माफ
राष्ट्रीयकृत बँका
खासगी बँका
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका
प्राथमिक कृषी पतसंस्था, सोसायट्या
यांच्याकडून घेतलेले पीक कर्ज रक्कम माफ होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जमीन धारणेची अट नसेल. शेतकऱ्यांनी घेतलेल्या पुरर्गठित पीक कर्जालाही योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत आणि 31 मार्च 2025 अखेर थकीत कर्जावर 2 लाखांची कर्जमाफी देण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या दरम्यान अल्पमुदत पीककर्जाला माफी देण्यात येईल. 2019 मधील महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील शेतकऱ्यांना 50 हजारांचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल.
शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे.. राष्ट्रीयकृत, खासगी, ग्रामीण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, प्राथमिक कृषी पतसंस्था (सोसायट्या) यांच्याकडून घेतलेले पीक कर्ज या योजनेत पांत्र आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जमीन धारणेची अट नाही. शेतकऱ्यांनी घेतलेल्या पुनर्गठित पीक कर्जालाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.
आयकर दात्या शेतकऱ्यांना नाही लाभ
सरकारने कर्जमाफीसाठी इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागवली आहे. परिणामी कर्जमाफी लांबणीवर पडली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती गोळा होताच शेतकर्यांना कर्जमाफी देण्यात येईल असे जाहीर केले आहे.
यासह राज्य सरकारचे मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, 25 हजारांपेक्षा जास्त वेतन, निवृत्ती वेतन प्राप्त शासकीय अधिकारी आणि कर्मचारी, सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी, 25 हजारांपेक्षा जास्त वेतन प्राप्त सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनाही या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.