AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॉडेलचा चोरुन व्हिडीओ काढणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्यावर गुन्हा दाखल

नवी मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता एजाज खान याच्यावर नवी मुंबईतील वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला मॉडेलचं चित्रिकरण करुन, अश्लील शेरेबाजी केल्याने आणि दिग्दर्शकाला मारहाण केल्याने एजाज खानविरोधात वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी एजाज खानविरोधात आता गुन्हा दाखल करुन घेतला आहे. नेमकं काय प्रकरण आहे? वाशी […]

मॉडेलचा चोरुन व्हिडीओ काढणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्यावर गुन्हा दाखल
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM
Share

नवी मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता एजाज खान याच्यावर नवी मुंबईतील वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला मॉडेलचं चित्रिकरण करुन, अश्लील शेरेबाजी केल्याने आणि दिग्दर्शकाला मारहाण केल्याने एजाज खानविरोधात वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी एजाज खानविरोधात आता गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

नेमकं काय प्रकरण आहे?

वाशी सिडको ऑडिटोरिअममध्ये 30 एप्रिल रोजी ‘इंडिया डिजाईन वीक’ नावाने फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. अभिनेता एजाज खान तिथे स्वतंत्र चेंजिंग रुम न दिल्याने वाद घालू लागला. त्यानंतर एजाज खानने चेंजिंग रुमजवळ महिला मॉडेलचे चित्रीकरण करुन, त्यांच्यावर अश्लील शेरेबाजी केली.

त्यानंतर एजाज खान याने दिग्दर्शक अब्दुल शिकूर खान आणि मॉडेल पंकज कुमार यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत दोन मुलं जखमी झाले.

आयोजिका दिपशिया चौधरी यांनी या सर्व प्रकरणाची वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अभिनेता एजाज खान आणि त्याच्या बाऊन्सरवर मॉडेलचं चित्रीकरण, मारहाण, शिवीगाळ आणि बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे, असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण आहे एजाज खान?

अभिनेता एजाज खान हा हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता आहे. ‘रक्त चरित्र’, ‘अल्लाह के बंदे’ हे त्याचे सिनेमे विशेष गाजले. ‘रहे तेरा आशीर्वाद’, ‘कहानी हमारे महाभारत की’ यांसारख्या काही टीव्ही मालिकाही एजाज खानने केल्या आहेत. एजाज खान कायम वादात अडकणारा अभिनेता आहे.

Follow Us
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा