मुंबई : मुंबईच्या नागपाडा भागातील एका मॉलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळावर पोहचल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Fire breaks out at a mall in Nagpada area of Mumbai)