ONGC Fire : उरणच्या ONGC प्लांटमधील आग नियंत्रणात, 4 जणांचा होरपळून मृत्यू

उरणच्या ओएनजीसी प्लांटमध्ये (ONGC Fire) लागलेली भीषण आग तब्बल 5 तासाने आटोक्यात आली आहे.

ONGC Fire : उरणच्या ONGC प्लांटमधील आग नियंत्रणात, 4 जणांचा होरपळून मृत्यू
Follow us
| Updated on: Sep 03, 2019 | 2:57 PM

ONGC Fire रायगड : उरणच्या ओएनजीसी प्लांटमध्ये (ONGC Fire) लागलेली भीषण आग तब्बल 5 तासाने आटोक्यात आली आहे. या आगीमुळे  4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यात ओएनजीसीच्या एका तर अग्निशमन दलाच्या तीन जवानाचा समावेश आहे. तर 7 ते 8 कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या जखमी कर्मचाऱ्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाने तब्बल 5 तास शर्थीचे प्रयत्न करुन या आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

उरणच्या ओएनजीच्या apu प्लांटमध्ये (ONGC Plant) सकाळी 7 च्या दरम्यान अचानक आग लागली होती. लिक्विड लिकेजमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पाच तासांनी उलटल्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आग नियंत्रणात आली असली तरी गावकऱ्यांमध्ये अद्याप भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच जवळपास 50 कर्मचारी आत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

“ओएनजीसी प्लांटमध्ये आग लागली आहे. त्यामुळे उरण प्लांटमधील गॅस हा गुजरातमधील हाजिरा प्लांटमध्ये वळवण्यात आला आहे. ओएनजीसीची आपत्ती व्यवस्थापन टीम या ठिकाणी पोहोचली असून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. दरम्यान यामुळे ऑईल प्रोसेसिंगवर कोणताही परिणाम झालेला नाही,” असे ट्विट करत ओएनजीसीने याबाबतची माहिती दिली आहे.

1 किमीपर्यंत जाण्यास मनाई

ओएनजीसी प्लांटमध्ये (ONGC Plant) लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोळ पसरले आहेत. त्यामुळे जवळपास 1 किमीपर्यंत परिसरात जाण्यास  नागरिकांना मनाई करण्यात आली आहे.

नागाव आणि मातवली गाव रिकामी

ओएनजीसी प्लांटमध्ये (ONGC Plant) लागलेल्या आगीमुळे उरणमधील नागाव व मातवली ही दोन्हीही गाव जवळपास रिकामी करण्यात आली आहेत. या गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. तसेच या प्लांटच्या परिसरात अनेक झोपडपट्टी धारक असून त्यांनाही सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे.

उरणमध्ये ओएनजीसीचा मोठा प्लांट आहे. अशाप्रकारे आग लागू नये याबाबत खबरदारी घ्या असे वारंवार सांगण्यात येत. मात्र सध्या ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे याची सरकारमार्फत निश्चितच चौकशी केली जाईल. तसेच ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दल, पोलीस आणि इतर यंत्रणा कार्यरत करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय घटनास्थळी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. जखमी कर्मचाऱ्यांना वाशी आणि इतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.

दरम्यान यात 5 कर्मचारी जखमी झाले होते. त्यांच्यावर ONGC रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान या 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.  मृतांमध्ये फायर ब्रिगडच्या 3 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर जवळपास 7 ते 8 जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर ONGC रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

दुसरीकडे ONGC आणि जेएनपीटी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

गेल्या महिन्यात अशाचप्रकारे ONGC च्या एका प्लांटमध्ये आग लागली होती. हा प्लांट फार मोठा आणि जुना असून आतमधील सामग्रीही जुनी झालेली आहे. यामुळे या प्लांटला नेहमीच गळतीचा धोका असतो. या आगीमुळे पुन्हा एकदा या कामगारांचा आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.