जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयासाठी The Viral Fever कंपनीकडून पाच लाखांची मदत

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'द व्हायरल फिव्हर' (The Viral Fever) कंपनीचे संस्थापक अर्णबकुमार यांनी हिंदूहृदययसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॅामा केअर रुग्णालयाला आर्थिक मदत केली आहे.

जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयासाठी The Viral Fever कंपनीकडून पाच लाखांची मदत
Arunabh Kumar (The Viral Fever) and Mayor Kishori Pednekar
| Edited By: | Updated on: Jun 14, 2021 | 7:26 PM

मुंबई : राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘द व्हायरल फिव्हर’ (The Viral Fever) कंपनीचे संस्थापक अर्णबकुमार यांनी हिंदूहृदययसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॅामा केअर रुग्णालयाला आर्थिक मदत केली आहे. या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने, रुग्णालयाचे अधिष्ठाता प्रमोद नगरकर यांच्याकडे पाच लाखाचा धनादेश मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते भायखळा येथील महापौर निवासस्थानी आज (14 जून) सुपुर्द करण्यात आला. (Five lakh grant from The Viral Fever Company for Jogeshwari Trauma Care Hospital)

द व्हायरल फिव्हर कंपनीचे संस्थापक अर्णबकुमार यांनी गरीब रुग्णांच्या आरोग्य कल्याणासाठी आर्थिक मदतीचे उचललेले पाऊल हे सर्वांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केले.याप्रसंगी व्हायरल फिव्हरच्या मानव संसाधन अधिकारी भुवनेश्वरी, जोगेश्वरीतील सामाजिक कार्यकर्ते विशाल येरागी आणि बुद्धेश्वर हे उपस्थित होते.

सहाय्यक अभियंता सुखदेव पाचारणेंकडून महापौर निधीसाठी 51 हजारांचा धनादेश

रस्ते विभागाचे (पूर्व उपनगरे) सहाय्यक अभियंता सुखदेव पाचारणे हे 31 मे 2021 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी जेवणावळी व इतर अनावश्यक खर्च टाळून 51 हजार रुपयांचा धनादेश महापौर निधीसाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे आज (14 जून) सुपूर्द करून एक वेगळा पायंडा निर्माण केला आहे.

सुखदेव पाचारणे यांनी सहाय्यक अभियंता अशोक तर्डेकर यांच्याप्रमाणेच सेवानिवृत्तीच्या दिवशी कुठलाही प्रकारचा कार्यक्रम आयोजित न करता होणारा अनावश्यक खर्च टाळून हा निधी गोरगरिबांच्या आरोग्यासाठी मदत म्हणून देण्यात येणाऱ्या महापौर निधीसाठी देऊन समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबद्दल सुखदेव पाचारणे यांचे अभिनंदन करून त्यांचा निर्णय इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. गोरगरिबांच्या आरोग्यासाठी हा निधी मदत म्हणून जाणार असल्यामुळे अत्यानंद होत असल्याचे महापौरांनी सांगितले. सुखदेव पाचारणे यांना दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा महापौरांनी यावेळी व्यक्त केली.

इतर बातम्या

शिवसेनेला चार कारकुन सांभाळणार असतील तर मला कधीही मान्य होणार नाही; राज ठाकरेंचे शब्दच ‘सेनावापसी’ रोखणार?

जब तक तोडेंगे नही, तब तक छोडेंगे नही, धारावी सातव्यांदा शून्यावर, महापालिकेने करुन दाखवलं!

(Five lakh grant from The Viral Fever Company for Jogeshwari Trauma Care Hospital)