ही मुंबई आहे मुंबई! शौचालय नेमकं कुणाचं? एक नाही दोन नाही तीन पक्षांचं भांडण, नेत्यांचे दौरे

महालक्ष्मी येथील धोबीघाट भागातील शौचालयाच्या मालकी हक्कावरून शिवसेना, मनसे आणि भाजप या तीन पक्षांमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे.

ही मुंबई आहे मुंबई! शौचालय नेमकं कुणाचं? एक नाही दोन नाही तीन पक्षांचं भांडण, नेत्यांचे दौरे
Ashish Shelar
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 6:47 PM

मुंबई : महालक्ष्मी येथील धोबीघाट भागातील शौचालयाच्या मालकी हक्कावरून शिवसेना, मनसे आणि भाजप या तीन पक्षांमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे. मनसे आणि भाजप एकत्र असून त्यांनी महापौर किशोरी पेडणेकर तसेच शिवसेनेवर गौरव्यवहाराचे आरोप केले आहेत. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी तसेच भाजप नेते आशिष शेलार यांनी आज या शौचालयाची पाहणी केली. (Shiv Sena, MNS and BJP conflict over toilet ownership in mahalaxmi dhobighat)

या शौचालयाचं उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर आणि खासदार अरविंद सावंत यांनी 12 जून रोजी केलं आहे आणि शौचालय चालवायची जबाबदारी धोबी कल्याण वेल्फेयर सोसायटीला देण्यात आली आहे. स्थानिक धोब्यांची मागणी आहे की सदर शौचालय हे आधीपासून धोबीघाट कल्याण औद्योगिक विकास कोऑपरेटिव्ह सोसायटी कडे होते. यातून मिळणारं उत्पन्न स्थानिक धोबी समाजाच्या कल्याणासाठी वापरले जात होते. त्यासाठी याची जबाबदारी आधीच्या सोसायटीकडेच देण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांची आहे. तसेच सदर शौचालय मोडकळीस आले होते तेव्हा महापालिकेकडे दुरुस्तीची विनंती करण्यात आली होती. शौचालय दुरुस्त करण्यात आले, मात्र त्याचे हक्क नव्या संस्थेला देण्यात आले आहेत.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीदेखील या शौचालयाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि लोकांची मागणी समजून घेतली. संदीप देशपांडे यांनी या प्रकरणात महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेनेवर सडकून टीका केली, शिवाय गैरव्यवहाराचे आरोपही केले आहेत.

संदीप देशपांडे म्हणाले की, नालेसफाई टेंडर, रोड घोटाळ्यात तर पैसे खातातच पण आता त्यांच्यावर शौचालयामध्येदेखील पैसे खाण्याची वेळ आली आहे. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. लोकांच्या समस्या काय आहेत आणि त्यांना सुविधा कशा देता येतील, त्यापेक्षा आम्हाला कसे पैसे खाता येतील यावर शिवसेनेचे लक्ष आहे आणि हे शौचालय त्याचं उत्तम उदाहरण आहे.

देशपांडे म्हणाले की, स्वतःच्या अधिकाराचा केलेला हा गैरवापर आहे. आपल्याच मुलाला टेंडर आणि आपल्याच गट अध्यक्षाला शौचालय अशी ही त्यांची पद्धत आहे. प्रत्येक वेळी महापौर म्हणतात की हे राजकारण आहे, ते राजकारण आहे. पण स्वतःच्या गट अध्यक्षाला शौचालय देणे हे राजकारण नाही का? स्वतःची थोबाडं या शौचालयावर लावली आहेत ते राजकरण नाही का? लोकांनी विरोध केला तर ते राजकारण आणि यांनी पैसे खाल्ले तर काय समाजकारण? आम्ही इथल्या लोकांसोबत आहोत आणि शेवटपर्यंत या लढ्यात सोबत राहू.

…तर महापौर आमचा बाप काढतील : शेलार

भाजप नेते आशिष शेलार यांनीदेखील याठिकाणी भेट दिली. शेलार म्हणाले की, पक्ष अभिनिवेश आणि अहंकारीपणा या दोन दुर्गुनांनी सध्या शिवसेना भरली आहे. लोकांची स्वच्छ्ता करणाऱ्या या लोकांचे काम काढून आपल्या लल्लूपंजूना दिले आहे. दिले तर दिले पण हे शौचालय अजून बंद आहे. शिवाय आता दरदेखील वाढवले आहेत. शौचालय उघडायचे नाही, स्थानिकांना डावलायचे आणि आता राजकारण करायचे हे जनता पाहत आहे. दुसऱ्या बाजूला महापौरांना काही बोलायची भीती वाटते, नाहीतर त्या आमचा बाप काढतील.

इतर बातम्या

शिवसेनेला चार कारकुन सांभाळणार असतील तर मला कधीही मान्य होणार नाही; राज ठाकरेंचे शब्दच ‘सेनावापसी’ रोखणार?

जब तक तोडेंगे नही, तब तक छोडेंगे नही, धारावी सातव्यांदा शून्यावर, महापालिकेने करुन दाखवलं!

(Shiv Sena, MNS and BJP conflict over toilet ownership in mahalaxmi dhobighat)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.