Tukaram Mundhe: दुधानंतर जिम सप्लिमेंट तुकाराम मुंढे यांच्या रडारवर, प्रोटीन पावडरविषयी मोठे भाष्य, इतक्या लाखांचा बसणार दंड

IAS Tukaram Mundhe Big Warning: धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आता दुधानंतर जिमच्या सप्लीमेंटकडे मोर्चा वळवला आहे. जीम, फिटनेस सेंटर येथे सप्लिमेंटची विक्री होत असेल तर त्यांना लायसन्स विकत घ्यावे लागेल, दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड बसेल असा सज्जड इशाराच मुंढे यांनी दिला.

Tukaram Mundhe: दुधानंतर जिम सप्लिमेंट तुकाराम मुंढे यांच्या रडारवर, प्रोटीन पावडरविषयी मोठे भाष्य, इतक्या लाखांचा बसणार दंड
दुधानंतर जिम सप्लिमेंट तुकाराम मुंढे यांच्या रडारवर
| Updated on: Nov 21, 2026 | 7:06 AM

IAS Tukaram Mundhe Big Warning: दूध, दही, मसाले, पनीर, तेल आणि हॉटेलमधील खाद्यपदार्थानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने आता हेल्थ सप्लिमेंटच्या बाजारात खळबळ उडवून देण्याची तयारी सुरू केली आहे. पोषक पूरक म्हणून ग्राहकांना भुरळ घालणाऱ्या या बाजारपेठेत लवकरच धडक कारवाईचा धडाका सुरू होणार आहे. हेल्थ सप्लिमेंटच्या विक्रीसाठी FDA ने घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. रोग बरा होतो असा दावा करणारे इन्फ्लुएन्सर, सोशल मीडियावरील दावे करणाऱ्या जाहिराती, तज्ज्ञ यांच्याविरोधातही मोर्चा उघडल्या जाणार आहे. एफडीएच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्वांवर कारवाईचा कडक इशारा आयुक्त तुकाराम मुंढें यांनी दिला आहे. त्यामुळे दिशाभूल करून हेल्थ सप्लिमेंट विक्री करणाऱ्या या बाजारपेठेत खळबळ उडाली आहे.

प्रोटीन पॉवडरही तुकाराम मुंढेंच्या रडारवर

Loading...

याविषयी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भूमिका स्पष्ट केली, ते म्हणाले की, आज आपण कंम्लायन्स ऑर्डरसंबधात बोलतो आहे. स्टेप बाय स्टेप आम्ही पुढे जात आहोत. या संबधी नोटीफिकेशन काढले आहे. ग्लोबल सप्लिमेंटच्या बाबतीत युवकांवर मोठा परिणाम होत आहे. आम्ही रेग्युलटर ऑथरीटी म्हणून सप्लिमेंटसंदर्भात आदेश दिले आहेत. एफडीएच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्वांवर कारवाईचा कडक इशारा आयुक्त तुकाराम मुंढें यांनी दिला आहे.

सप्लिमेंटबाबत दिशाभूल करण्यात येते

व्यायमशाळा, हॉस्पिटल येथे सप्लिमेंट विकल्या जातात. जीम, फिटनेस सेंटर येथे सप्लिमेंटची विक्री होत असेल तर त्यांना लायसन्स विकत घ्यावे लागेल. लैगिंक स्वास्थ या बाबतीतही सप्लिंमेंटबाबत मिसलिड केले जात आहे. अनुपालन आदेश आपण काढले आहेत. प्रोटीन पॉवडर, हर्बल कॅप्सुल याच्या विक्रीत गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढ झालेली आहे. जे क्लेम करण्यात येतात त्यापेक्षा हे प्रॉडक्ट वेगळेच असल्याचे निदर्शनास आले आहे. व्याप्ती आणि किती परवानाधारक आहेत ते मी सांगितले आहे. सप्लिमेंटवरील चुकीच्या क्लेममुळे नागरीक मिस लिड होत आहेत, असे आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले.

ते म्हणाले की, विभाग निहाय आम्ही कारवाया केल्या आहेत. विविध प्रकारचे दंड आपण ठोठावले आहेत. नागरिकांना माझे आवाहन आहे कुठल्याही दबावाला बळी पडू नका. माझा सप्लिंमेंट उत्पादक आणि विक्रेते यांना इशारा आहे की आमच्या परवानगीशिवाय विक्री करायची नाही. एडिबेल ऑईलच्या बाबतीत 1263 तपासणी करण्यात आली आहे. २२ कोटींच्या स्पाईसेंस आपण आतापर्यंत जप्त केल्या आहेत. लोकांच्या जागृतेसाठी आम्ही सोशल मीडियाचा वापर करत आहोत. आमचे अधिकारी रेग्युलेटर म्हणून काम करत आहे. सोया मिल्क प्रोडक्टमध्ये आम्हाला दुधाची भेसळ आढळून आली. आमच्याकडे या संदर्भात शेतकर्‍यांच्या तक्रारी आल्याची माहिती आयुक्त तुकाराम मु्ंढे यांनी दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us