AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत पोलीस कुटुंबीयांचे मोफत लसीकरण, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ

मुंबई पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित केलेल्या मोफत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

मुंबईत पोलीस कुटुंबीयांचे मोफत लसीकरण, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ
Aaditya Thackeray
| Edited By: | Updated on: Jul 02, 2021 | 4:47 PM
Share

मुंबई : कोरोना संकटात मुंबई पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. आगामी काळातही त्यांच्यावर सर्वात महत्त्वाची जबाबदारी असेल. दरम्यान, या मुंबई पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित केलेल्या मोफत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने चेंबूरच्या ग्रीन एकर्स शाळेत आयोजित केलेल्या या लसीकरण मोहिमेत 1000 पोलीस कुटुंबियांचे मोफत लसीकरण करण्यात आले. (Free vaccination of police families in Mumbai, Aditya Thackeray launches campaign)

“पोलीस बांधव हे आमच्या परिवाराचाच भाग असून त्यांच्या विविध समस्या प्राधान्याने सोडविणे, हे आमचे कर्तव्य आहे. तसेच अशा विशेष लसीकरण मोहिमांमुळे शासनावरील ताण काही प्रमाणात कमी होऊ शकेल,” अशा शब्दांत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोहिमेचे लोकार्पण करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. तर, पोलीस कुटुंबीयांसाठी अशा रीतीने भविष्यात आणखी विशेष मोहिमा आयोजित करण्याचा मानस खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला.

फ्रंट लाईन वर्कर्स म्हणून सरकारच्या वतीने मुंबई पोलिसांचे मोफत लसीकरण शासनाच्या वतीने याआधीच करण्यात आले. मात्र पोलीस कुटुंबीयांचे लसीकरण सुकर आणि जलद व्हावे, या हेतूने खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने आणि श्रीमती तारादेवी फाऊंडेशन, सरकार ग्रुप यांच्या सहाय्याने ही विशेष लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती. याआधी पश्चिम उपनगरातील पोलीस कुटुंबियांसाठी वांद्रे येथे तर सीआयएसएफ जवनांसाठी अशीच लसीकरण मोहीम खासदार शेवाळे यांनी आयोजित केली होती.

शुभारंभाच्या कार्यक्रमावेळी खासदार राहुल शेवाळे यांच्यासह मुंबईच्या महापौर किशोरीपेडणेकर, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, आमदार प्रकाश फातर्फेकर, अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे, नगरसेवक अमेय घोले, अनिल पाटणकर, तारादेवी गुप्ता आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

इतर बातम्या

Aditya Thackeray LIVE | कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही : आदित्य ठाकरे

Coroanvirus: मुंबईत 90 लाखांच्या टार्गेटपैकी 44 लाख नागरिकांचं लसीकरण संपन्न: आदित्य ठाकरे

(Free vaccination of police families in Mumbai, Aditya Thackeray launches campaign)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.