एपीएमसीची ‘रेकॉर्ड रुम’ उघडून जुगाराचा डाव, फोटो काढताना दोघे पळाले, गोपनीय फाईल रामभरोसे!

| Updated on: Dec 13, 2019 | 11:16 AM

एपीएमसीच्या प्रशासकीय इमारतीच्या तळ मजल्यावर पाच घाऊक बाजाराच्या आणि अधिकाऱ्याच्या अत्यंत गोपनीय आणि महत्वाच्या सर्व फाईल, रजिस्टर आणि सर्व फाईल्स ठेवण्यात आल्या आहेत.

एपीएमसीची रेकॉर्ड रुम उघडून जुगाराचा डाव, फोटो काढताना दोघे पळाले, गोपनीय फाईल रामभरोसे!
Follow us on

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय इमारती मध्ये असलेल्या अत्यंत गोपनीय आणि महत्वाच्या असलेल्या अभिलेख कक्ष  (रेकॉर्ड रूम) धोक्यात आला आहे. बुधवारी रात्री अभिलेख कक्ष उघडण्यात आला होता. त्यामध्ये काही कर्मचारी मद्यपान करून बाहेर जुगार (Gambling at APMC market ) खेळत होते. ज्यावेळी फोटो काढण्यात आला, त्यावेळी तिथून दोघे अभिलेख कक्षात पळून गेले. यामध्ये असे दिसून येत आहे की बाजार समितीमध्ये असलेल्या मुख्य सुरक्षा अधिकारी आणि काही अधिकाऱयांच्या आशीर्वादाने असे अड्डे चालले आहेत. ज्यामुळे पाच मार्केटची सगळ्या जुनी फाईल राम भरोसे आहे.  (Gambling at APMC market )

अभिलेख कक्ष बनला जुगाराचा अड्डा!

बाजार समितीमध्ये पाच मार्केटच्या सुरक्षेसाठी सुरक्षा गार्ड तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर बाजार समितीची पूर्ण जबाबदारी सुरक्षा रक्षकाकडे असतात, पण काही दिवसापासून मुख्य सुरक्षा अधिकाराच्या दुर्लक्षामुळे अशा त्रुटी होत आहेत.

एपीएमसीच्या प्रशासकीय इमारतीच्या तळ मजल्यावर पाच घाऊक बाजाराच्या आणि अधिकाऱ्याच्या अत्यंत गोपनीय आणि महत्वाच्या सर्व फाईल, रजिस्टर आणि सर्व फाईल्स ठेवण्यात आल्या आहेत. हा रेकॉर्ड रूम साधारणपणे सकाळी 10 वाजता उघडला जातो आणि  संध्याकाळी 6 वाजता बंद होतो.

बाजार समितीमध्ये असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली अभिलेख कक्ष असतात.  पण काही दिवसांपासून बाजारसमितीचे कर्मचारी हे रेकॉर्ड रुम रात्री उघडतात असे दिसून येत आहे. रात्री रेकॉर्ड रुम उघडून आत मद्यपान करून बाहेर जुगार खेळत निदर्शनास आले.

जुगार सुरू असल्याचे छायाचित्र ज्यावेळी काढण्यात आले, त्यावेळी चौघे होते. तिथून दोघे रेकॉर्ड रूममध्ये पळून गेले आणि बाकी दोघे जुगार खेळत असताना फोटो मध्ये आले. हळूहळू ते दोघे पण निघून गेले.

यामागे नक्कीच बाजार समित्याच्या एखाद्या मोठा अधिकाऱ्याचा आशीर्वादाखाली अभिलेख कक्ष ( रेकॉर्ड रूम) रात्री उघडून तिथे जुगार आणि मद्यपान चालू असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रशासनच्या भोंगळ कारभारामुळे जर एखादी फाईल किंवा रजिस्टर येथून गहाळ झाली किंवा चोरी झाली तर त्याला जबाबदार कोण?

बुधवारी संध्याकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी ज्यावेळी छायाचित्र काढले तेव्हा तेथे पत्ते खेळत बसलेल्यांपैकी २ लोक रिकॉर्ड रूमच्या आत शिरुन गायब झाले. आतमध्ये सुद्धा काहीजण बसले होते. ते कोण होते याची माहिती मिळू शकली नाही.

चौकशी होणार का?

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये काही कर्मचारी अभिलेख कक्षेत आणि शेजारी जुगार आणि मद्यपान करत असल्याने निदर्शनास आले. जुगार खेळताना चौघेजण होते तिथून दोघे रेकॉर्ड रूममध्ये पळून गेले. या सर्वांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.