Bhanushali Building Collapse | भानुशाली इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची मदत, पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती

| Updated on: Jul 17, 2020 | 6:48 PM

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करुन इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत रहिवाशांची निवाऱ्याची व्यवस्था सरकारच्या वतीने करण्याची ग्वाहीही अस्लम शेख यांनी दिली.

Bhanushali Building Collapse | भानुशाली इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची मदत, पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती
Follow us on

मुंबई : मुंबईतील फोर्ट भागातील भानुशाली इमारत दुर्घटनेतील (Bhanushali Building Collapse Victims) मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली. तसेच, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करुन इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत रहिवाशांची निवाऱ्याची व्यवस्था सरकारच्या वतीने करण्याची ग्वाहीही अस्लम शेख यांनी दिली (Bhanushali Building Collapse Victims).

काल फोर्ट भागातील सहा मजली भानुशाली बिल्डिंगचा भाग कोसळून त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. अग्निशामक दल आणि महानगरपालिकेच्या वतीने अद्याप शोध मोहिम सुरु आहे. दुर्घटनेबाबत माहिती मिळताच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुर्घटनाग्रस्तांना संपूर्ण मदत करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, महापालिका कामगार, पोलीस यांच्यासह स्थानिक नागरीकांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त ठिकाणी तातडीने मदतीचे काम सुरु करण्यात आले. ढिगारा उपसण्याचे काम गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होते. दुर्घटनाग्रस्तांना चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावे. तसेच, त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना अस्लम शेख यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना अतिरिक्त मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याबाबत जिल्हा प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत.

Bhanushali Building Collapse Victims

संबंधित बातम्या :

Mumbai Building Collapse | मुंबईवर धोकादायक इमारतींचं सावट, 7 वर्षात 3,945 इमारती कोसळल्या

Bhanushali Building collapse | दुर्लक्ष नाही, पण आम्ही लोकांना घरातून खेचून बाहेर काढू शकत नाही : महापौर