गौरी पालवे प्रकरणात मोठी अपडेट! अनंत गर्जेच्या जुन्या प्रेयसीने गर्भपाताच्या रिपोर्ट्समागील सांगितले सत्य

डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. गौरीला घरात अनंत गर्जे यांच्या जुन्या प्रेयसीच्या गर्भपाताचे रिपोर्ट्स सापडले होते. आता याबाबात मोठी माहिती समोर येत आहे.

गौरी पालवे प्रकरणात मोठी अपडेट! अनंत गर्जेच्या जुन्या प्रेयसीने गर्भपाताच्या रिपोर्ट्समागील सांगितले सत्य
Gauri palve Case
Image Credit source: Tv9 Marathi
Updated on: Dec 02, 2025 | 6:43 PM

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी मुबंईतील राहत्या घरात आत्महत्या केली. अनंत गर्जे आणि गौरीचे फेब्रुवारी महिन्यात लग्न झाले होते. लग्नाच्या काही महिन्यातच गौरीने आत्महत्या केली. गौरीला घराच्या शिफ्टींगच्या वेळी काही पेपर सापडले होते. त्यामध्ये एका महिलेचा उल्लेख होता. ही महिला अनंत गर्जेची जुनी प्रेयसी असल्याचे म्हटले जाते. तसेच तिच्या गर्भपाताच्या पेपरवर नवऱ्याचे नाव अनंत गर्जे असे होते. आता या प्रकरणात अनंत गर्जेच्या जुन्या प्रेयसीने जबाब नोंदवला आहे.

गौरीच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जेवर वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता जुन्या प्रेयसीने वरळी पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला आहे. २०२२ पासून माझा आणि अनंतचा काहीही सबंध नाही. गौरीला घरी सापडलेल्या कागदपत्रांबद्दल मला काहीही कल्पना नाही असे जुन्या प्रेयसीने म्हटले आहे.

अनंतच्या शरीरावर असलेल्या जखमांबद्दलही मोठी माहिती समोर

गौरीने आत्महत्या केल्यानंतर अनंत फ्लॅटच्या खिडकीतून आतमध्ये गेला होता. त्यावेळी त्याच्या शरीरावर किरकोळ जखमा झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. अनंत गौरीला घेऊन पोतदार रुग्णालयात गेला तेंव्हा ती मृत झाल्याचे कळताच त्याने स्व:ताचे डोके भिंतीवर आपटण्याचाही प्रयत्न केला होता. पोतदार रुग्णालयात अनंत स्वतःला मारून घेतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागला आहे. तसेच पोलिसांनी अनंत गर्जेने आपल्या घराच्या खिडकीला ज्या व्यक्तिकडून जाळ्या बसवल्या त्याचाही जबाब नोंदवला आहे.

अनंत गर्जेची मानसशास्त्रीय तपासणी होणार

या प्रकरणात अनंत गर्जेची मानसिक तपासणी देखील होणार आहे. पोलीस वैज्ञानिक तज्ञांच्या माध्यमातून तपास करणार आहेत. अनंत गरजेची पॉलीग्राफ टेस्ट करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले. तसेच आरोपी अनंत गर्जेला 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

अंजली दामानियांनी दिली होती प्रतिक्रिया

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली होती. “गौरी आधी बीडीडी चाळीत राहायची. तिथून त्यांना टॉवरमध्ये शिफ्ट करायचं होतं, तेव्हा पॅकिंगच्यावेळी तिला काही पेपर्स सापडले. त्यात एका बाईच्या नावाचा उल्लेख होता. तिचा गर्भपात करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं, त्यावर तिच्या नवऱ्याचं नाव अनंत गर्जे लिहिलेलं होतं. हे पेपर मिळाल्यावर त्यांचे वाद वाढत गेले. त्यातून हे झालं,” असे अंजली दमानिया म्हणाल्या होत्या.