
आईचे आपल्या मुलांवार कायमच सर्वात जास्त प्रेम असते. त्यांच्या सुखासाठी ती कोणत्याही स्थराला जाऊ शकते. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका आईबद्दल सांगणार आहोत, जिने आपल्या मुलीच्या बॉयफ्रेंडशी अफेअर केले. इतकंच नाही, तर ती प्रेमात इतकी वेडी झाली की तिने आपल्याच घरातून सोन्याचे दागिने चोरले. पण घरातून पळून गेली नाही. तिने असा काही डाव आखला की सत्य समजल्यानंतर पोलिसांच्या देखील पायाखालची जमीन सरकली.
खरं तर, प्रकरण असं आहे की रमेश धोंडू हल्दीवे आपल्या कुटुंबासह मुंबईच्या गोरेगांव पूर्व येथे राहतात. उर्मिला आणि रमेश यांचा विवाह होऊन 18 वर्षे झाली होती. रमेशची पत्नी उर्मिलाने एके दिवशी आपल्या पतीला सांगितलं की कपाटातून त्यांचे दागिने गायब झाले आहेत. इतकंच नाही, तर पत्नीने आपल्याच पतीवर चोरीचा आरोप लावला आणि नंतर दिंडोशी पोलिस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार दाखल केली.
वाचा: नाग आणि नागिण कसे ओळखावे? कोण असतं सर्वात जास्त विषारी? सत्य कळताच थरकाप उडेल
मुलीचा प्रेमीच निघाला आईचा बॉयफ्रेंड
मात्र, कोणताही बाहेरचा संशयित नसल्याने पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांचे कॉल रेकॉर्ड आणि फोन लोकेशन तपासायला सुरुवात केली. तपासातून समजलं की उर्मिला एका दुसऱ्या व्यक्तीच्या सातत्याने संपर्कात होती, ज्याच्यासोबत ती घरातून पळून जाण्याची योजना आखत होती. उर्मिलाने 100 ग्रॅमपेक्षा जास्त सोन्याचे दागिने चोरले, ते विकले आणि सुमारे 10 लाख रुपये तिच्या प्रेमीच्या खात्यात हस्तांतरित केले.
पण यात सर्वात आश्चर्यकारक बाब ही होती की उर्मिलाचा प्रेमी दुसरा कोणी नसून तिच्याच 18 वर्षीय मुलीचा बॉयफ्रेंड होता, ज्याच्याशी ती सातत्याने बोलत होती आणि पळून जाण्याच्या तयारीत होती.
मुलीच्या प्रेमीने कबूल केली गोष्ट…
सत्य समोर आल्यानंतर उर्मिलाच्या मुलीच्या प्रेमीला ताब्यात घेण्यात आलं, ज्याने चौकशीदरम्यान कबूल केलं की उर्मिलाने त्याला चोरीचे काही दागिने दिले होते. जेव्हा त्या मुलाची चौकशी झाली, तेव्हा उर्मिलाने चोरी आणि आपल्या पतीला सोडण्याच्या योजनेची कबुली दिली. कबुलीजबाबानंतर, पोलिसांनी उर्मिलाने ओळखलेल्या एका ज्वेलरी शॉपमधून चोरीचे दागिने जप्त केले. उर्मिला आणि तिच्या मुलीच्या प्रेमी दोघांनाही अटक करण्यात आली आहे. उर्मिलाला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे आणि तिच्या प्रेमीच्या भूमिकेची पुढील तपासणी सुरू आहे.