AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी सक्तीला गुणरत्न सदावर्तेंचाच कडाडून विरोध; टॅक्सी-रिक्षा चालकांसाठी आंदोलनाच्या मैदानात, विरोधामागे महायुतीतील अंतर्गत कलह?

Gunaratna Sadavarte On Marathi: 1 मेपासून मुंबईत टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी सक्ती करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्याविरोधात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आंदोलनाच्या मैदानात उतरले आहेत. त्यांचा या निर्णयाला विरोध का आहे?

मराठी सक्तीला गुणरत्न सदावर्तेंचाच कडाडून विरोध; टॅक्सी-रिक्षा चालकांसाठी आंदोलनाच्या मैदानात, विरोधामागे महायुतीतील अंतर्गत कलह?
गुणरत्न सदावर्ते, प्रताप सरनाईक, मराठी भाषा सक्तीकरणImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 23, 2026 | 1:24 PM
Share

Gunaratna Sadavarte Opposed Marathi Compulsion decision: 1 मे पासून मुंबईमध्ये टॅक्सी रिक्षा चालकांना मराठी सक्ती केल्यास आंदोलन करणार असा इशारा ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे. जनसंघाचे सर्वेसर्वा दत्तोपंतजी ठेंगणे यांच्या विचार सरणीतून वकील गुणरत्न सदावर्ते आंदोलन करणार आहेत. मुंबईतील पाच लाख रिक्षाचालक टॅक्सीचालक यांच्या मागे आपण उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मे पासून रिक्षा टॅक्सी चालक यांना मराठी सक्ती करण्याच्या विरोधात सदावर्ते मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या विरोधामागे महायुतीतील अंतर्गत कलह तर नाही ना, अशी चर्चाही सुरू झाली आहे.

वाहन परवाना घेताना मराठी भाषेचे प्रमाणपत्र आवश्यक?

दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक सुरू आहे. 1 मे पासून संपूर्ण राज्यभर टॅक्सी आणि रिक्षा चालक त्यांच्यासाठी मराठी सक्तीच्या निर्णयावरून ही बैठक सध्या सुरू आहे. या बैठकीमध्ये मंत्री प्रताप सरनाईक परिवहन आयुक्त नार्वेकर तसेच इतर रिक्षाचालक टॅक्सी चालक संघटनेचे काही पदाधिकारी व तज्ञ लोक असल्याची माहिती समोर येत आहे.

या बैठकीत काही भाषा तज्ज्ञ देखील आहेत. आजच्या बैठकीत रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी मराठीच्या अभ्यासक्रमा बाबत चर्चा होणार आहे. मोठ्या प्रमाणात ॲाटो रिक्षा, ओला, उबर, रॅपीडो अश्या सगळ्या परिवहन सेवा आहेत. पण तरीही वाहतुकीवरील ताण वाढत आहेत. आधी पासून परिवहन विभागाचे भाषेविषयीचे धोरण आहे. अनेकांनी मला याबाबत फोन करून सांगितल्याचे सरनाईकांनी स्पष्ट केले.

आमिर खानला मराठी शिकविणारी, जेनेलिया हीला सुद्धा मराठी शिकविणारी ही मंडळी आहेत. २२ विभाग आम्ही एक अभ्यासक्रम तयार करतील आणि नतंर तो आपल्याला देतील. मेहेंदळे यांनी मराठी भाषेसाठी अनेक उपक्रम राबविले आहे. मराठी भाषा शिकल्यावंतर मराठी राज्य शासनाचे मान्यता प्राप्त प्रमाणपत्र देतात. उद्या लायसन्स देताना वाहनधारकांकडे असे प्रमाणपत्र सुद्धा आम्ही अनिवार्य करू शकतो, असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.

मराठीसाठी दोन पानी पुस्तिका

काही लोक फक्त मराठी येत राजकारण करण्यासाठी आम्ही मराठी शिकवतो असे फलक लावतात दुसऱ्या दिवशी तो फलक आणि तो वर्ग गायब होतो, असा टोला सरनाईक म्हणाले. मराठी भाषा शिकण्यासाठी आपण दोन पानी पुस्तिका तयार करणार आहोत. १६ तारखेला जी बॅंकेचा अध्यक्ष त्यांच्या ताब्यातून गेल्यामुळे ते फ्रस्टेट झाले आहेत. मी २८ एप्रिल रोजी बैठक बोलावणार आहे. त्यावेळी मी शशांक राव सह सगळ्या युनियन यांना बोलावणार आहे. त्यावेळी या सगळ्यावर बोलणार आहे. आमच्या आरटीओ च्या अधिकारी यांनी पण काही चुकीचे परवाने किंवा परमिट दिले असतील तर त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा सरनाईक यांनी केला. महाराष्ट्रात व्यवसाय करणार असाल तर तुम्हाला मराठी यावेच लागेल. महाराष्ट्रात राहून मराठी शिकणार नाही अशी मुजोरी चालणार नाही, अशी समज त्यांनी दिली.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच