AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gunratna Sadavarte : शरद पवारांच्या घरावरील आंदोलनाचे नागपूर कनेक्शन? सदावर्तेंना आलेल्या फोनमुळे सस्पेन्स वाढला

पवारांच्या (Sharad Pawar) घरावरील हल्ल्याआधी नागपूरहून सदावर्तेंना एक कॉल आल्याचा दावा, सरकारी वकिलांनी केलाय. त्यामुळे हा कॉल कुणचा ज्याने एवढा राडा झाला, त्याची चर्चा सुरू आहे.

Gunratna Sadavarte : शरद पवारांच्या घरावरील आंदोलनाचे नागपूर कनेक्शन? सदावर्तेंना आलेल्या फोनमुळे सस्पेन्स वाढला
गुणरत्न सदावर्ते यांना नागपुरातून कुणाचा फोन आला?Image Credit source: tv9
| Updated on: Apr 11, 2022 | 11:09 PM
Share

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे (St Worker Protest) वकील गुणरत्न सदावर्तेंना (Gunratna Sadavarte) आणखी 2 दिवस पोलीस कोठडीत काढावे लागणार आहेत. कारण कोर्टानं जामीन न देता त्यांची कोठडी आणखी वाढवली आहे, तर पवारांच्या (Sharad Pawar) घरावरील हल्ल्याआधी नागपूरहून सदावर्तेंना एक कॉल आल्याचा दावा, सरकारी वकिलांनी केलाय. त्यामुळे हा कॉल कुणचा ज्याने एवढा राडा झाला, त्याची चर्चा सुरू आहे. आधी सदावर्ते 9 एप्रिलला सदावर्तेंना 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. आता पुन्हा कोठडीत वाढ करण्यात आलीय. 13 एप्रिलपर्यंत सदावर्ते पोलीस कोठडीत असतील, हे स्पष्ट झालंय. शरद पवारांच्या मुंबईतल्या घरावर एसटी संपकऱ्यांचा जो हल्ला झाला त्याला सदावर्तेंच जबाबदार असल्याचा आरोप पोलिसांचा आहे, तर सदावर्तेंच्या वकीलाने हे सर्व आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहेत. मात्र त्यात सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी कोर्टात नागपूर कनेक्शनचा उल्लेख केला.

कोर्टात काय घडलं?

सदावर्तेंची कोठडी मागतना सरकारी वकील प्रदीप घरत यांनी काही महत्वाच्या बाबी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या. गुणरत्न सदावर्ते तपासाला सहकार्य करत नाहीत, त्यामुळं 11 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर पवारांच्या घरावरील हल्ल्यात आणखी चार आरोपींना ताब्यात घेतलंय, असंही घरत म्हणाले आहेत. MJT मराठी यू ट्यूब चॅनलच्या चंद्रकांत सूर्यवंशी या पत्रकाराशी सदावर्ते संपर्कात होते. हल्ल्याआधी एक बैठक झाली, नागपुरातूनही एक कॉल आला होता. नागपुरातून कुणाचा फोन आला होता, तपास करायचा आहे. फोनसंदर्भात आरोपी कोणतीही माहिती देत नाहीत, असा आरोप यावेळी करण्यात आला. तर 530 रुपये सदावर्तेंनी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून घेतले आजपर्यंत सदावर्तेंनी दीड कोटी गोळा केले, असेही सांगण्यात आले.

सदावर्तेंच्या वकिलाचा युक्तीवाद

गुणरत्न सदावर्तेंकडून अॅड. गिरीश कुलकर्णींनी युक्तिवाद केला, यावेळी कुलकर्णींनी म्हटलंय, सदावर्ते हल्ल्यावेळी घटनास्थळी नव्हते. एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले म्हणता तशी तक्रार नोंदवली का ? नागपूरच्या व्यक्तीची कोर्टाला माहिती दिली, मग नाव का घेत नाही? नागपुरातील ‘ती’ व्यक्ती कोण?, तपास कसा लागला नाही? असा सवाल कुलकर्णी यांनी केला. तसेच पवारांच्या घरावरील हल्ल्यात कुणीही जखमी नाही. बारामतीत जाणार हा एक आंदोलनाचा भाग, त्यात गैर काय? पवारांनी सरकार बनवलं त्यामुळं त्यांना जाब विचारण्यासाठी आंदोलन झालं, असेही ते म्हणाले.

पोलिसांना माहिती मिळूनही दुर्लक्ष?

सदावर्तेंची चिथावणी आणि त्यानंतरच पवारांच्या निवासस्थानी हल्ल्याचं प्लॅनिंग कसं आणि कोणी केलं ? याचा तपास पोलिसांना करायचा आहे, आणि त्यासंदर्भातली माहिती सदावर्तेंकडून घेण्याचा प्रयत्न पोलिसांचा आहे. तर पवारांच्या निवासस्थानी एसटीच्या संपकऱ्यांचा जो हल्ला झाला. त्याची माहिती पोलिसांना होती, हे स्पष्ट करणारा खळबळजनक पुरावा tv9च्या हाती लागलाय..पोलिसांच्या विशेष शाखेनं 4 एप्रिललाच आंदोलनाचा अलर्ट कायदा सुव्यवस्थेचे पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटलांना दिला होता. मग यावरुन हा प्रश्न निर्माण होतो की, पोलिस जबाबदार आहेत का ?, माहिती मिळूनही हल्ल्याकडे दुर्लक्ष का केलं का? असाही सवाल आता उपस्थित केला जात आहे.

विशेष शाखेनं दिलेल्या पत्रात काय होतं?

सिल्व्हर ओक, मातोश्रीवर आंदोलन होऊ शकते. एसटीची सुनावणी कोर्टात सुरु असल्यानं कर्मचारी आझाद मैदानात येऊन जाऊन आंदोलन करत आहे. कोर्टाचा निकाल एसटी कर्मचाऱ्यांविरोधात लागण्याची शक्यता आंदोलनकांना वाटत आहे. त्यामुळे आंदोलकांनी सिल्व्हर ओक आणि मातोश्रीवर आंदोलनाचा धमकी वजा इशारा दिलाय. आंदोलक आक्रमक झाले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आंदोलन करण्यासाठी आंदोलक, खासगी वाहनानं मुंबईत प्रवेश करणार आहेत त्यामुळं मुंबईच्या प्रवेशद्वारावर बंदोबस्त वाढवावा. सिल्व्हर ओक, मातोश्री, परिवहन मंत्र्यांचा बंगला या ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे. म्हणजेच सिल्व्हर ओकवर आंदोलन होऊ शकते, याची माहिती पोलिसांना होती..मग त्यानंतरही दुर्लक्ष का करण्यात आलं ?, याचीही चौकशी झाली पाहिजे.

Anil Deshmukh : अनिल देशमुखांना 16 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी, कस्टडी न देण्याची मागणी

Vasant More: …आणि वसंत मोरेंनी राज ठाकरेंचे पायच धरले! फेसबुक पोस्ट करत काय म्हणाले मोरे?

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंनी पैसे घेतल्याचा स्वारगेटमधील एसटी कर्मचाऱ्याचा दावा, गोळा करायला कुणी सांगितले?

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.