Hanuman Chalisa Row: राणा दाम्पत्याला आज दिलासा मिळणार? मुंबई सत्र न्यायालयाकडून बेल की जेल?

| Updated on: Apr 26, 2022 | 9:59 AM

आयपीसी कलम 123-A नुसार राजद्रोहाच्या (Sedition) खटल्यातील जामिनासाठी आज मंगळवारी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे आमदार पती रवी राणा (Ravi Rana) आज मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल करणार आहेत. त्यावर आजच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Hanuman Chalisa Row: राणा दाम्पत्याला आज दिलासा मिळणार? मुंबई सत्र न्यायालयाकडून बेल की जेल?
नवनीत राणा, रवी राणा
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबईः गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणाला ज्वर आणणाऱ्या आणि शेवटी तुरुंगवारी घडलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयातून बेल मिळणार की जेल याची उत्सुकता लागली आहे. आयपीसी कलम 123-A नुसार राजद्रोहाच्या (Sedition) खटल्यातील जामिनासाठी आज मंगळवारी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे आमदार पती रवी राणा (Ravi Rana) आज मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल करणार आहेत. त्यावर आजच सुनावणी होण्याची शक्यता आहे. वांद्रे येथील न्यायालयाने त्यांची रविवारी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केलीय. मात्र, त्यांच्या जामिनावर तात्काल सुनावणी करण्यास नकार देत त्यासाठी 29 एप्रिलची तारीख दिली होती. त्यामुळे आज राणा दाम्पत्याला बेल मिळणार की, 6 मे पर्यंतचे दिवस तुरुंगात काढावे लागणार हे स्पष्ट होणार आहे.

पंगा पडला महागात

राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट धरला होता. त्यांना पोलिसांनी मुंबईतील घराबाहेर पडू नका अशा सूचना दिल्या होत्या. या दरम्यान शिवसैनिकांनी त्यांच्या घरासमोर घेराव घातला. त्यानंतर राणा दाम्पत्याने आपला मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाचा निर्णय बदलला. मात्र, त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर प्रक्षोभक भाषण करणे आणि दोन समाजात तणाव निर्माण केल्याप्रकरणी तक्रार नोंदवत अटक केली. दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर राजद्रोह आणि राज्य प्रशासनाला आव्हान देणे, त्यांच्याविरोधात कट रचण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राणांना मिळाला धक्का

मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी सोमवारी सुनावणी झाली. यावेळी उच्च न्यायालयाने राजद्रोहाची एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली. सरकारी वकिलांनी न्यायालयाला राणा दाम्पत्याने पोलिसांशी कशी हुज्जत घातली, त्यांच्यावर दबाव आणला आणि आपल्या अटकेला विरोध करत पोलीस ठाण्यात यायला नकार दिला हे पटवून दिले. सोबतच सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाला हे सुद्धा सांगितले की, राणा दाम्पत्याने पोलिसांना कसा धमकीवजा इशारा दिला. यामुळे राणा दाम्पत्यावर पोलिसांशी दुवर्तन केल्याची कलमेही लावण्यात आली आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात तरी राणा दाम्पत्याला दिलासा मिळणार का, हे पाहावे लागेल.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!