महाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं

| Updated on: Jun 21, 2021 | 10:42 PM

भारतात सध्या कोरोना रुग्ण संख्या कमी होते आहे. मात्र, कोरोना विषाणू सतत रुप बदल आहे. कोरोनाच्या बदलत्या वेरियंटमुळे चिंता कायम आहे. कोरोना वायरसच्या नव्या रुपाला डेल्टा प्लस हे नाव देण्यात आलं आहे. Delta plus variant

महाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं
Corona
Follow us on

मुंबई: भारतात सध्या कोरोना रुग्ण संख्या कमी होते आहे. मात्र, कोरोना विषाणू सतत रुप बदल आहे. कोरोनाच्या बदलत्या वेरियंटमुळे चिंता कायम आहे. कोरोना वायरसच्या नव्या रुपाला डेल्टा प्लस हे नाव देण्यात आलं आहे. डेल्टा प्लसला शास्त्रीय नाव AY.1 Variant असं देण्यात  आलं आहे. महाराट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरियंटचे 21 रुग्ण आढळल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांन दिली आहे. डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यानं महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. Health Minister Rajesh Tope said Delta plus variant of coronavirus has been detected in 21 people in Maharashtra

कुठे आढळले डेल्टा प्लसचे रुग्ण

महाराष्ट्रात आढळलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लसचे रुग्ण रत्नागिरी, जळगाव, मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आहेत. रत्नागिरीमध्ये 9, जळगावमध्ये 7, मुंबईमध्ये 2, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्गमध्ये एक रुग्ण समोर आला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

रुग्णांच्या प्रवासाचा इतिहास तपासणार

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार डेल्टा प्लसचे जे रुग्ण आढळलेत त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती की नाही याची माहिती घेण्याचं काम सुरु आहे. तर, दुसरीकडे त्यांनी कुठे कुठे प्रवास केला होता याची माहिती घेतली जात आहे. डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील 2 ते 3 आठवडे स्रव जिल्ह्यांना 100 नमुने चाचणीसाठी पाठवण्यास सांगण्यात आलं आहे.

नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट (B.1.617.2.1 किंवा AY.1) डेल्टा मधील उत्परिवर्तनामुळे किंवा B.1.617.2, व्हेरिएंटमुळे तयार झाला आहे. डेल्टा प्लस कोरोना वेरियंट पहिल्या वेरियंट पेक्षा धोकादायक अशल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर डिसेझ कंट्रोल, नवी दिल्लीचे संचालक डॉ. सुजीत सिंग यांनी दिली आहे.

भारतात चिंतेचे कारण नाही!

सध्या ‘डेल्टा प्लस’मुळे भारतामध्ये चिंता करण्याचे कारण नाही. हे प्रकरण युरोपमध्ये मार्चच्या उत्तरार्धात समोर आले आहे, असे समजते. 17 जूनपर्यंत, जीआयएसएआयडी, ओपन सायन्स डेटाबेसच्या म्हणण्यानुसार, जगभरात या प्रकारांच्या 63 घटना घडल्या; त्यात सहा भारतीयांचा समावेश आहे. कोरोना टास्कफोर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. व्ही.के. पॉल म्हणतात, “आम्ही INSACOGच्या माध्यमातून त्याचे अस्तित्व आणि वाढीवर लक्ष ठेवत आहोत. अद्यापपर्यंत हे माहित नाही की, या विषाणूची वाढ झालेली की नाही. जोपर्यंत तसे दिसत नाही, तो पर्यंत काळजीचे काही कारण नाही.”

याचा अर्थ असा नाही की देशाने यावर लक्ष ठेवू नये. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रथम नोंदवलेला डेल्टा प्रकार हा पूर्वीपेक्षा अपेक्षेपेक्षा अधिक वेगवान होता आणि एम्समध्ये नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, 2021मध्ये हाच व्हेरियंट देशातील दुसर्‍या लाटेचे कारण ठरला होते. सुरुवातीच्या काळात चीनमधून हा विषाणू भारतात आला आहे आणि सध्या देशभरात या विषाणूचा प्रादुर्भाव आहे.

संबंधित बातम्या:

कोरोना विषाणूचा ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ प्रकार नेमका काय? कशी घ्याल स्वतःची काळजी?

नवी मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा रुग्ण?

Health Minister Rajesh Tope said Delta plus variant of coronavirus has been detected in 21 people in Maharashtra