मुंबईसह राज्यात महिलांसाठी आता फिरता दवाखाना; राजेश टोपे यांची मोठी घोषणा

| Updated on: Feb 03, 2021 | 1:27 PM

मुंबईसह राज्यात महिलांसाठी आता फिरता दवाखाना दिसेल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबईसह राज्यात महिलांसाठी आता फिरता दवाखाना; राजेश टोपे यांची मोठी घोषणा
आरोग्य विभागातील भरतीबाबत राजेश टोपेंचे मोठे विधान
Follow us on

मुंबई : मुंबईसह राज्यात महिलांसाठी आता फिरता दवाखाना दिसेल, अशी माहिती ( Rajesh Tope Says Mobile Clinic Will Be Available Soon) राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून लवकरच मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्याधुनिक आणि अद्ययावत फिरता दवाखाना सुरु करण्यात येईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं ( Rajesh Tope Says Mobile Clinic Will Be Available Soon).

राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जनता दरबार उपक्रमासाठी आले असता राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

महिलांना घरातून रुग्णालयात आणणे. विशेषतः गरोदर महिला आहेत, त्यांना त्यांच्या घरी सुरक्षित सोडणे यासाठी या फिरत्या दवाखान्याची सुविधा असणार आहे. या फिरत्या दवाखान्यात टेस्टिंग, लॅब, 81 प्रकारची औषधं, 40 प्रकारच्या टेस्ट, सोनोग्राफी आणि महिलांचे बाळंतपण केले जाऊ शकते.

ग्रामीण भागात प्रत्येक जिल्ह्याला दोन – दोन फिरते दवाखाने असणार आहेत. ग्रामीण भागासह मुंबईमध्ये या फिरत्या दवाखान्याची अधिक वाढ केली जाणार आहे. याचा चांगला परिणाम होईल, असंही राजेश टोपे यांनी सांगितले.

दरम्यान, याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.

Rajesh Tope Says Mobile Clinic Will Be Available Soon

संबंधित बातम्या :

Budget Marathi 2021-22 | अर्थसंकल्पात मोफत लसीकरणाची तरतूद करा, राजेश टोपेंची केंद्राला विनंती