Budget Marathi 2021-22 | अर्थसंकल्पात मोफत लसीकरणाची तरतूद करा, राजेश टोपेंची केंद्राला विनंती

राजेश टोपे यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मोफत लसीकरणाची तरतूद करावी विनंती केंद्र सरकारला केली आहे. (Rajesh Tope Free corona vaccination)

  • दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद
  • Published On - 9:09 AM, 1 Feb 2021
Budget Marathi 2021-22 | अर्थसंकल्पात मोफत लसीकरणाची तरतूद करा, राजेश टोपेंची केंद्राला विनंती
राजेश टोपे, निर्मला सीतारमण

औरंगाबाद : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प (Budget) सादर करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. देशभर कोरोना संसर्गाचे संकट असल्यामुळे सरकार यावेळी आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Top) यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मोफत लसीकरणाची (Free corona vaccination) तरतूद करावी विनंती केंद्र सरकारला केली आहे. ते औरंगाबादमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Rajesh Tope request central government to avail the Free corona vaccination)

कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी देशात लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोनाकाळात फ्रन्टवर्कर्स म्हणून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. त्यानंतर वृद्ध, आजारी नागरिक आणि सामान्यांना लस दिली जाईल. यावेळी राष्ट्रीय पातळीवरील लसीकरणाला येणारा खर्च कोटींमध्ये आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार असले तरी, सामान्यांना मिळणाऱ्या लसीचा भार कोण उचलणार याचे चित्र अजूनतरी स्पष्ट नाही. केंद्र सरकारने हा खर्च उचलला नाही, तर लसीकरणाचा बोजा राज्य सरकारवर पडणार आहे. याच कारणामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मोफत लसीकरणाची तरतूद करावी अशी विनंती केली आहे.

अन्यथा नागरिक लस घेणार नाहीत

यावेळी बोलताना राजेश टोपे यांनी राज्यातील तसेच देशातील गरीब नागरिकांना मोफत लस मिळाली पाहिजे अशी भूमिका मांडली. “लसीकरणाचा कार्यक्रम हा देशपातळीवरच राबवायचा असतो. लस घेण्यासाठी पैसे लागत असतील तर नागरिक लस घेणार नाहीत. नागरिकांनी लस घेतली नाही तर अनेक दुष्परिणाम पाहायला मिळतील. त्यामुळे गरीब लोकांसाठी मोफत लसीकरण करायलाच हवं,” असे टोपे म्हणाले.

कोरोना टॅक्स येणार?

केंद्र सरकारकडून आगामी अर्थसंकल्पात कोरोना टॅक्स सादर केला जाण्याची शक्यता आहे. कारण कोरोना काळात सरकारने लसीकरण, आर्थिक पॅकेज, उपचारासाठी लागणारी सामग्री यासाठी भरपूर पैसा खर्च केला. याशिवाय आरोग्य विभागातल चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकारला पैशांची आवश्यकता लागेल. त्यामुळे कोरोना टॅक्सच्या माध्यमातून हा सर्व पैसा गोळा करुन आणखी जास्त चांगली सुविधा दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

संबधित बातम्या :

Budget Marathi 2021 LIVE : निर्मला सीतारमण अर्थ मंत्रालयात दाखल, बजेटमधील घोषणांकडे लक्ष

Budget 2021 |अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर उद्योग जगतात मोठ्या घडामोडी, ‘या’ 130 कंपन्या तिमाही निकाल सादर करणार

Budget 2021 : अनेक वस्तूंवरील सीमा शुल्क घटण्याची शक्यता, कोणत्या वस्तू स्वस्त होणार?

(Rajesh Tope request central government to avail the Free corona vaccination)