Mumbai Water Cut : मुंबईतील ‘या’ भागात 8 आणि 9 फेब्रुवारीला पाणीकपात, जाणून घ्या कुठल्या विभागात होणार पाणीटंचाई

एम पश्चिम आणि एम पूर्व या विभागात चेंबूर, गोवंडी, देवनार आणि मानखुर्द येथे पाणीपुरवठा बंद रहाणार आहे. या विभागातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा ठेवावा.

Mumbai Water Cut : मुंबईतील 'या' भागात 8 आणि 9 फेब्रुवारीला पाणीकपात, जाणून घ्या कुठल्या विभागात होणार पाणीटंचाई
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 11:37 AM

मुंबई : मुंबईकरांना भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी महापालिकेने मुंबईतील 12 विभागात 30 जानेवारी सकाळी 10 ते 31 जानेवारी सकाळी 10 पर्यंत पाणीपुरवठा पूर्णतः बंद केला होता. तर, दोन विभागात 25 टक्के पाणी कपात केली होती . त्यापाठोपाठ आता मुंबईतील काही विभागात 8 आणि 9 फेब्रुवारीला पूर्ण पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा असे आवाहनही मुंबई महापालिकेने केले आहे.

30 आणि 31 जानेवारीला भांडुप जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामांमुळे पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. आता 8 फेब्रुवारीला ट्रॉम्बे उच्च-स्तरीय जलाशयाच्या इनलेट व्हॉल्व्हच्या बदलीसह अन्य दुरुस्ती आणि देखभालीचे काम महापालिका करणार आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम मुंबईतील काही भागांत 8 ते 9 फेब्रुवारीदरम्यान सकाळी 10 ते सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

एम पश्चिम आणि एम पूर्व या विभागात चेंबूर, गोवंडी, देवनार आणि मानखुर्द येथे पाणीपुरवठा बंद रहाणार आहे. या विभागातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा ठेवावा. तसेच, कपातीच्या काळात पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेने केले आहे. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत असे 24 तास पाणी उपलब्ध होणार नाही.

2023-24 या वर्षात या कामासाठी 32 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या महापालिकेच्या अंदाजपत्रकात मुंबईतील पाणीपुरवठा योग्य रीतीने व्हावा यासाठी अनेक सुधारित योजना मांडल्या आहेत.

भांडुप कॉम्प्लेक्स येथील सुमारे 44 वर्षांपूर्वी बांधलेला 1910 एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्पाचे आयुष्य संपत आले आहे. त्याठिकाणी प्रतिदिन नवा 2000 MLD पाणीपुरवठा करणारा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येणार आहे. यासाठी ३५० कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

कुलाबा सीवरेज ट्रीटमेंट प्लांटमधील सांडपाणी पिण्यायोग्य पाण्यात रूपांतरित करण्यासाठी 12 एमएलडीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याची तयारी पाणीपुरवठा विभाग करत आहे. यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.