AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hussain Dalwai | हुसेन दलवाई यांचा जन्मदिवस; दलवाई यांची संसेदेतील कामगिरी माहिती आहे का?

काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई हे राजकीयच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर आहेत. कामगार, अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न त्यांनी धसास लावले. ते ऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्याबद्दल...

Hussain Dalwai | हुसेन दलवाई यांचा जन्मदिवस; दलवाई यांची संसेदेतील कामगिरी माहिती आहे का?
हुसेन दलवाई, काँग्रेसचे नेते
| Updated on: Feb 16, 2022 | 2:00 AM
Share

काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांना 16 फेब्रुवारीला एकोणऐंशी वर्षे पूर्ण झालीत. ते ऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहेत. हुसेन दलवाई यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1943 मध्ये झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मिरजोली (Mirjoli in Chiplun taluka) या गावात त्यांचा जन्म झाला. हाफिजा उमर हे आईच, तर उमर खान हे वडिलांचं नाव. मुंबईतील इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. समाजशास्त्रात त्यांनी एम. ए. केलंय. शमा दलवाई असं त्यांच्या पत्नीचं नाव. हुसेन दलवाई हे पत्रकार तसेच लेखकही आहेत. प्रसार माध्यमांमध्ये (In the media) पक्षाची भूमिका ते मांडत असतात. कामगार संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड विधानसभा (Khed Assembly) मतदारसंघातून चार वेळा निवडूण आले.

राज्यसभेवर जाण्याची संधी

हुसेन दलवाई हे केंद्रीय हज समिती व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष होते. 1998 ते 2003 या कालावधीत त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र विधान परिषदेचे प्रतिनिधित्व केले. तसेच वक्फ बोर्डाचे कामही त्यांनी सांभाळले. ऑक्टोबर 1999 ते २००३ या कालावधीत ते कामगार मंत्री होते. 2010 मध्ये ते पुन्हा काँग्रेसकडून निवडूण आले. एप्रिल 2011 ते 2014 या कालखंडात ते राज्यसभेचे खासदार होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या ठिकाणी त्यांची वर्णी लागली. एप्रिल 2014 ते 2020 या कालावधीत त्यांना पुन्हा राज्यसभेवर निवडूण येण्याची संधी मिळाली.

संसदेत विविध समित्यांवर काम

हुसेन दलवाई यांनी संसदेत काही समित्यांवर काम केले. त्यामध्ये ऑगस्ट 2011 ते ऑगस्ट 2012 या कालावधीत ते ग्रामीण विकास समितीवर सदस्य होते. डिसेंबर 2011 ते 2013 या कालावधीत त्यांनी नॅशनल कॅडेट कार्प्सच्या केंद्रीय सल्लागार समितीवर काम केले. ऑगस्ट 2012 ते 2014 या कालावधीत ते रेल्वेच्या समितीवर सदस्य होते. मे 2013 ते 2014 या कालावधीत ते पीटिशन समितीवर सदस्य होते. सप्टेंबर 2014 ते 2015 या कालावधीत ते नागरी विकास समितीवर सदस्य होते.

पंतप्रधानांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्या मंदिराच्या भूमिपूजनाला गेले होते. तेव्हा हुसेन दलवाई यांनी पंतप्रधानांवर टीका केली. पंतप्रधान असताना पंडित जवाहरलाल नेहरू हे सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला गेले नव्हते. मी एका धर्मनिरपेक्ष देशाचा प्रमुख आहे. मग, विशिष्ट धर्माच्या कार्यक्रमात कसा जाऊ असं नेहरू म्हणाले होते, याची आठवण हुसेन दलवाई यांनी करून दिली.

Amravati | अमरावती महापालिका प्रभाग रचना, 300 पेक्षा जास्त हरकती, दोन मार्चला अंतिम प्रभाग रचना

Nagpur NMC | नागपूर मनपा निवडणुकीची पूर्वतयारी, प्रभागाच्या प्रारुपावर 122 आक्षेप, सुनावणीसाठी नागरिकांना बोलावणार?

Nagpur  corona | नागपुरात कोव्हॅक्सिन लसीअभावी लसीकरण ठप्प, परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांना कशी मिळणार लस?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.