उर्फीच्या जीवाला काहीही झालं तर चित्रा वाघच जबाबदार; वकिलांनी या शक्यताही सांगितल्या…

| Updated on: Jan 13, 2023 | 7:42 PM

महिला आयोगाबरोबरच चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या जाहिररित्या वक्तव्यामुळे समाजातील शांतता भंग होऊ शकते.

उर्फीच्या जीवाला काहीही झालं तर चित्रा वाघच जबाबदार; वकिलांनी या शक्यताही सांगितल्या...
Follow us on

मुंबईः अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या फॅशनमुळे आणि बिनधास्त राहणीमानामुळे चर्चेत आली आहे. त्यामुळे संस्कृतीवर हल्ला होत असल्याचे कारण सांगत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद या अभिनेत्रीला थोबडून काढण्याची भाषा वापरली होती. चित्रा वाघ यांच्या या वक्तव्यामुळे कायद्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगत वकील नितीन सातपुते यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

उर्फी जावेदच्या जीवाला काही धोका काहीही झालं तरी त्याला चित्रा वाघच जबाबदार असल्याचे या वकिलांनी म्हटले आहे. त्यामुळे उर्फी आणि चित्रा वाघ यांचा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे.

वकील उर्फी जावेद ही अभिनेत्री असल्याने ती तिच्या स्टाईलप्रमाणे राहते. त्यामुळे ती ज्या पद्धती प्रमाणे कपडे वापरते. त्या कपड्यांमुळे कुठेही अश्लिलता निर्माण होत नसल्याचे स्पष्टीकरण वकील नितीन सातपुते यांनी दिले.

मात्र उर्फी जावेद हिच्या बोल्डपणामुळे तिला थोबडण्याची ज्या प्रमाणे भाषा केली जाते. ती चुकीची असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

उर्फी जावेदला थोबडण्याची भाषा जाहिररित्या चित्रा वाघ वारंवार करत आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे उर्फी जावेदवर हल्ला होण्याची शक्यात आहे.

याप्रकारचा तिच्यावर जीवघेणा हल्ला झाला तर त्या सर्वस्वी जबाबदार या चित्रा वाघ असू शकतात अशी तक्रार सातपुते यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे कोणीही व्यक्ती त्यांच्यावर हल्ला करू शकते असंही यावळी सांगण्यात आले.

उर्फी जावेद आपल्या फॅशनप्रमाणे राहते, त्यामुळे त्यामध्ये कोणतीही अश्लिलता नाही. उर्फीबाबत अपशब्द वापरणे, जाहिररित्या थोबडण्याची भाषा वापरणे हे चूक आहे.

चित्रा वाघ यांच्याकडून सर्वांसमोर अशी धमकीची वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची कोणीही अनुकरण केले आणि त्यामध्ये जर उर्फी जावेदवर हल्ला झाला तर त्याला जबाबदार या चित्रा वाघच असणार आहेत. त्यामुळे नितीन सातपुते यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

महिला आयोगाबरोबरच चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या जाहिररित्या वक्तव्यामुळे समाजातील शांतता भंग होऊ शकते.

त्यामुळे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणीही यावेळी केली आहे. भडकाऊ प्रकारची कोणतीही स्टेटमेंट आणि ठेचून मारण्याची भाषा वगैरे त्यांनी करू नये अशी मागणीही महिला आयोगाकडे करण्यात आली आहे.