AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वतःची बायको सोबत ठेवली की, विनयभंग होत नसतो, गुणरत्न सदावर्ते यांचा राष्ट्रवादीच्या नेत्याला टोमणा

वो जितेंद्र आव्हाड वो शरद पवार स्वताची बायको सोबत ठेवली की, विनयभंगाचे आरोप होत नसतात.

स्वतःची बायको सोबत ठेवली की, विनयभंग होत नसतो, गुणरत्न सदावर्ते यांचा राष्ट्रवादीच्या नेत्याला टोमणा
गुणरत्न सदावर्ते Image Credit source: tv 9
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Nov 25, 2022 | 7:01 PM
Share

उस्मानाबाद – स्वतंत्र मराठवाडा झालाचं पाहिजे. विरोध झाल्यास कायद्यानं उत्तर देणार, असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय. तर, स्वतंत्र मराठवाड्याचा विरोध मोडून काढू. कोर्टाबाहेर रस्त्यावरदेखील लढू, असा इशारा उस्मानाबादमध्ये संवाद परिषदेचे आयोजन करणारे आयोजक रेवन भोसले यांनी आक्रमक पावित्रा घेतला. उस्मानाबादमध्ये मराठा संघटनांकडून गुणरत्न सदावर्ते यांचा जाहीर निषेध करण्यात आला. स्वतंत्र मराठवाडा मागणीवरून राजकारण चांगलंच पेटलं. स्वतंत्र मराठवाडा परिषदेसाठी गुणरत्न सदावर्ते उस्मानाबादमध्ये होते. स्वतंत्र मराठवाडा झालाच पाहिजे. विरोध करणाऱ्यांना कायद्यानं उत्तर देईन, असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, वो जितेंद्र आव्हाड वो शरद पवार स्वताची बायको सोबत ठेवली की, विनयभंगाचे आरोप होत नसतात. विनयभंगही होत नसतो, असं विधान आपल्या बायकोसोबत असताना त्यांनी केलं. खरं खरं प्रेम सोबत ठेवायचं. भगिनींचा आदर राखला पाहिजे, या भावनेतून जगायचं. हे धडे तुम्हाला कोणी देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

तुम्ही एका अत्याचारीत महिलेला जातीसोबत घेऊन बोललात. हे अत्यंत वेदनादायी आणि चुकीचं आहे. महिला आयोग नक्की कारवाई करेल, ही भावना आहे. दिल्लीत भगिनीची दिल्लीत हत्या झाली. त्याप्रकरणी तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि बिळातले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कलम ३४ खाली आरोपी करून गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी रोडमॅप तयार करायचा आम्ही आलो होतो. सकाळपासून कष्टकऱ्यांना पिटाळून लावण्यात आलं. या सर्व चौकशीच्या बाबी आहेत. साडेचार वाजता चक्र फिरले आणि दारं उघडले. याला म्हणतात रयतेचं सरकार, असंही सदावर्ते यांनी सांगितलं.

Follow Us