राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप, मागण्या मान्य न झाल्याने घेतला निर्णय

याबाबत मार्डच्या राज्यस्तरीय बैठकीत तात्काळ निर्णय न झाल्यास 1 ऑक्टोबरपासून बेमुदत राज्यस्तरीय संप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शिवाय मागण्या लेखी स्वरुपात मान्य होईपर्यंत संप मागे घेतला जाणार नसल्याचे निवासी डॉक्टरांनी म्हटले आहे.

राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप, मागण्या मान्य न झाल्याने घेतला निर्णय
राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप
| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 12:33 AM

मुंबई : आपल्या मागण्या मान्य न झाल्याने राज्यभरातील 5 हजाराहून अधिक निवासी डॉक्टर 1 ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारणार आहेत. राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील हॉस्टेलसंबंधित समस्या, पालिका महाविद्यालयातील डॉक्टरांचा टीडीएस, प्रोत्साहन भत्ता, वैद्यकीय पदवुत्तर अभ्यासक्रमाची फी माफी आदी मागण्या निवासी डॉक्टरांनी केल्या होत्या. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन सेंट्रल मार्ड संघटनेच्या शिष्टमंडळाला देण्यात आले होते. मात्र महिना उलटूनही याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याने निवासी डॉक्टरांनी पुन्हा संपाचा इशारा दिला आहे. (Indefinite strike of resident doctors across the state, decision taken due to non-acceptance of demands)

निवासी डॉक्टरांनी संबंधित विभागाला या मागण्यांविषयीचे स्मरणपत्र सादर केले होते. आपल्या मागण्यांविषयी लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती या स्मरणपत्रातून मार्डने राज्य शासनाला केली होती. तसेच याबाबत मार्डच्या राज्यस्तरीय बैठकीत तात्काळ निर्णय न झाल्यास 1 ऑक्टोबरपासून बेमुदत राज्यस्तरीय संप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शिवाय मागण्या लेखी स्वरुपात मान्य होईपर्यंत संप मागे घेतला जाणार नसल्याचे निवासी डॉक्टरांनी म्हटले आहे. कोरोना काळात निवासी डॉक्टरांनी बजावलेली सेवा आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी फी माफीचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप फी माफीचा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे अखेर निवासी डॉक्टरांनी 1 ऑक्टोबर पर्यंत मागणी मान्य न झाल्यास संपावर जाण्याचे स्पष्ट केले.

मार्डने राज ठाकरेंकडेही मांडले होते गाऱ्हाणे

कोरोनाच्या भयानक परिस्थितीत मुंबईत निवासी डॉक्टर्स जीव धोक्यात घालून काम करत होते. मात्र तरीही या डॉक्टरांना वेतनवाढ मिळाली नाही. याशिवाय त्यांच्या विद्यावेतनावर टॅक्सही कापला जातो. यांसह इतर सर्व मागण्यांचे गाऱ्हाण घेऊन मार्ड डॉक्टरांच्या शिष्टमंडळांनी चार महिन्यांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचीही भेट घेतली होती. राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी मार्ड डॉक्टरांचे शिष्टमंडळांची बैठक आयोजित केली होती. कोरोना काळात मुंबईत निवासी डॉक्टर्स जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मुंबईत एकूण 3 हजार मार्ड डॉक्टर आहेत. पण तरीही त्या डॉक्टरांना वेतनवाढीतील वेतन मिळालेलं नाही. याशिवाय विद्यावेतनावर टॅक्सही कापला जातो. याशिवाय वर्षभर इतर सर्व वैद्यकीय शिक्षण बंद असताना वर्षभराची संपूर्ण फी देखील आकारली आहे. (Indefinite strike of resident doctors across the state, decision taken due to non-acceptance of demands)

इतर बातम्या

VIDEO : सचिनला ड्रेसिंगरुमध्ये पाहताच इशान किशन थबकला, पुढे जे केलं ते पाहाच

फडणवीस, पटोले, वळसे-पाटील ते दीया मिर्झा, ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानित