इंदूमिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची मुंडे, वर्षा गायकवाडांकडून पाहणी; पुतळ्याची प्रतिकृती लवकरच अंतिम होणार

. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्याची 25 फुटी प्रतिकृती सुप्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार व त्यांचे सहकारी करत आहेत. या प्रतिकृतीची मंत्रिमंडळाने नेमलेल्या उपसमितीने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे जाऊन नुकतीच पाहणी केली होती, त्या प्रतिकृतीमध्ये काही बदलही सुचवण्यात आले होते.

इंदूमिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची मुंडे, वर्षा गायकवाडांकडून पाहणी; पुतळ्याची प्रतिकृती लवकरच अंतिम होणार
इंदूमिल आंबेडकर स्मारकाची वर्षा गायकवाड, धनंजय मुंडे यांच्याकडून पाहणी
महादेव कांबळे

|

Jun 15, 2022 | 6:25 PM

मुंबई: मुंबईतील इंदूमिल परिसरात (Indumil Area) उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे (Babasaheb Ambedkar International Memorial) सनियंत्रण व काम वेगाने पूर्ण व्हावे यासाठी नियुक्त मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Social Justice Minister Dhananjay Munde) यांच्यासह शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्यासह मान्यवरांनी आज इंदूमिल स्मारक कामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ज्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे.

त्याच्या पादपीठाचे काम आता पूर्णत्वाकडे आले असून, पुतळ्याची 25 फुटी प्रतिकृतीदेखील लवकरच अंतिम करण्यात येणार आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी एकूण कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

शिल्पकार पद्मभूषण राम सुतार प्रतिकृती साकारणार

येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्याची 25 फुटी प्रतिकृती सुप्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार व त्यांचे सहकारी करत आहेत. या प्रतिकृतीची मंत्रिमंडळाने नेमलेल्या उपसमितीने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे जाऊन नुकतीच पाहणी केली होती, त्या प्रतिकृतीमध्ये काही बदलही सुचवण्यात आले होते.

प्रतिकृती लवकरच अंतिम

त्यानुसार नवीन बदलांसह शिल्पकार अनिल सुतार यांनी प्रतिकृतीबाबतचे सादरीकरण केले. ही प्रतिकृती लवकरच अंतिम करण्यात येणार असून, त्यानंतर मुख्य पुतळ्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राज्यमंत्री संजय बनसोडे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, शिल्पकार अनिल राम सुतार, समीर अनिल सुतार, संजय पाटील, आर्किटेक्ट शशी प्रभू, इतिहासतज्ज्ञ डॉ. आर मालाणी, सर जेजे आर्ट स्कुल चे प्रा. विश्वनाथ सहारे आदी उपस्थित होते.

स्मारक भविष्यात जगभरात ओळखले जावे

हे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याने त्याला पूरक असा दर्जा सांभाळून काटेकोरपणे यंत्रणांनी खरबदरी घ्यावी असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले. हे स्मारक भविष्यात जगभरात ओळखले जावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी, विषयतज्ज्ञ, सर्व पक्षीय नेते यांसह विविध मान्यवरांच्या सूचना लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

दैनंदिन कामांचा चार्ट

दरम्यान समुद्र किनारचे वातावरण, वातावरणातील होणारे बदल, पावसाळ्यात कामाची गती आदी बाबी विचारात घेऊन दैनंदिन कामांचा चार्ट बनवून त्यावर अंमल करावा, अशा सूचना यावेळी मुंडे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें