जळगाव जिल्हा दूध संघाची चौकशी खुशाल करा; एकनाथ खडसे म्हणाले मुख्यमंत्र्याच्या आदेशाने असे आदेश निघत नाहीत

| Updated on: Jul 28, 2022 | 9:30 PM

मुख्यमंत्र्यांनी हे आदेश काढले आहे मुख्यमंत्र्याच्या आदेशाने असे आदेश निघत नाहीत शासनाच्या मान्यतेने या आदेश निघतात मात्र आता मुख्यमंत्र्यांनी हे आदेश काढले गेले आहेत, त्यामुळे जर चौकशी करण्यात येत असेल तर त्यांनी खुशाल चौकशी करावी असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

जळगाव जिल्हा दूध संघाची चौकशी खुशाल करा; एकनाथ खडसे म्हणाले मुख्यमंत्र्याच्या आदेशाने असे आदेश निघत नाहीत
Follow us on

जळगावः जळगाव जिल्हा दुध संघातील (Jalgaon Dudh Sangh) कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी शासनाकडून आता चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश राज्य शासनाचे उपसचिव एन. बी. मराळे यांनी दिले आहेत. चौकशी समितीत 5 अधिकाऱ्यांचा समावेश असून 20 ऑगस्ट पर्यंत चौकशी करून तो अहवाल राज्य शासनाला देण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (NCP MLA Eknath Khadase) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) हे आदेश काढले आहेत मुख्यमंत्र्याच्या आदेशाने असे आदेश निघत नाहीत शासनाच्या मान्यतेने असे आदेश निघत असतात असेही त्यांनी यावेळी सांगितले. जळगाव दूध संघाची चौकशी करण्यात येत असली तरी ती चौकशी अत्यंत पारदर्शकपणे झाली पाहिजे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

चौकशी खुशाल करण्यात यावी

जळगाव दूध संघाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले की, जिल्हा दूध संघाची चौकशी खुशाल करण्यात यावी मात्र ज्या प्रकारे ही चौकशी करण्यात येणार आहे ती करण्यात येत असलेली चौकशी अत्यंत पारदर्शकपणे करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रशासक नेमले आहे ते नियमबाह्य

जळगाव दूध संघामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला त्यानंतर संबंधित दूध संघातील व्यक्तींची चौकशीही करण्याची मागणी करण्यात आली होती,तरीही आता ही चौकशी करण्यात येत असून ही चौकशी राजकीय दबावापोटी होत असेल तर ती त्याप्रकारे चौकशी होता कामा नये असे मतही त्यावेळी मांडण्यात आले.
यावेळी एकनाथ खडसे यांनी सांगितले की, दूध संघावर जे प्रशासक नेमले आहे ते नियमबाह्य नेमण्यात आले आहेत, त्यामुळे हे चुकीचे आहे असे प्रशासक नेमण्याचा अधिकार या सरकारला नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्याच्या आदेशाने असे आदेश निघत नाहीत