तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात, जयंत पाटलांच्या हॉकी संघाला हटके शुभेच्छा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हॉकी संघाला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्हीह टप्प्यात आणून कार्यक्रम केलात, अशा आगळ्यावेगळ्या शुभेच्छा जयंत पाटलांनी दिल्या आहेत. (jayant patil congratulates indian hockey team after winning bronze medal)

तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात, जयंत पाटलांच्या हॉकी संघाला हटके शुभेच्छा
jayant patil

मुंबई: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हॉकी संघाला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्हीह टप्प्यात आणून कार्यक्रम केलात, अशा आगळ्यावेगळ्या शुभेच्छा जयंत पाटलांनी दिल्या आहेत. जयंत पाटलांच्या या राजकीय टच असलेल्या शुभेच्छांची सध्या एकच चर्चा रंगली आहे. (jayant patil congratulates indian hockey team and his captain manpreet singh after winning bronze medal)

तब्बल 41 वर्षांचा लॉकडाऊन फोडत भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक मिळविलं आहे. त्यामुळे देशभरातून हॉकी संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच जयंत पाटलांनी हटके शुभेच्छा दिल्याने या शुभेच्छांची जोरदार चर्चा रंगली आहे. तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात… अभिनंदन टीम इंडिया. आज 41 वर्षाने हॉकी संघाला कांस्यपदक मिळवता आले आहे. हॉकी संघाने मिळवलेलं हे यश भारतीयांचा उर भरून आणणारे आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

‘सुवर्ण’युगाच्या दिशेने नवी सुरुवात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. 41 वर्षांची प्रतिक्षा… प्रयत्न… परिश्रमानंतर मिळालेल्या या यशाचा आनंद अवर्णनीय आहे. या पदकाने देशाचा गौरव वाढला असून भारतीय हॉकीच्या ‘सुवर्ण’युगाच्या दिशेने ही नवी सुरुवात ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष संघाचे अभिनंदन केले आहे.

भारतीय पुरुष हॉकी संघाने संघर्षपूर्ण खेळ करत ऑलिंपिक कांस्यपदक जिंकल्याबद्दल संघातील खेळाडू, प्रशिक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांचे पवार यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने कधीकाळी ऑलिंपिकची आठ सुवर्णपदकं जिंकली होती. 1980 च्या शेवटच्या पदकानंतर पदक जिंकण्यासाठी आजपर्यंत प्रतिक्षा करावी लागली. गेल्यावेळच्या कांस्यपदक विजेत्या जर्मनीविरुद्ध 1-3 अशा गोल पिछाडीवर असतानाही संघाने 5-4 गोलफरकाने मिळवलेला विजय हा दूर्दम्य इच्छाशक्ती, संघभावना, कठोर परीश्रमांचे फळ आहे. भारतीय खेळाडूंनी आज देशवासियांची मने जिंकली आहेत. मी सर्व खेळाडूंचं, प्रशिक्षकांचं, व्यवस्थापक, सपोर्ट स्टाफचं अभिनंदन करतो. भविष्यातील सुवर्ण कामगिरीसाठी शुभेच्छा देतो. अशा शब्दात त्यांनी कौतुक केले आहे. (jayant patil congratulates indian hockey team and his captain manpreet singh after winning bronze medal)

 

संबंधित बातम्या:

Tokyo Olympic 2021 : ‘तू इतिहास लिहिलासं’, भारतीय हॉकी संघाच्या कर्णधाराचं पंतप्रधानांकडून कौतुक

Tokyo Olympic 2020 : ‘चक दे इंडिया’, 41 वर्षानंतर हॉकीमध्ये पदक, भारताचा जर्मनीवर 5-4 ने विजय

Tokyo Olympics 2020 Live : रवि दहियाकडून सुवर्णपदकाची आशा, विनेश फोगाटचा क्वॉर्टर फायनलमध्ये पराभूत

(jayant patil congratulates indian hockey team and his captain manpreet singh after winning bronze medal)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI