Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जितेंद्र आव्हाडांकडून दिलीप वळसे पाटलांचं कौतुक; म्हणाले, त्यांच्यामुळेच देवेंद्र फडणवीस…

Jitendra Awhad on Dilip Walse Patil : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिलीप वळसे पाटील यांचं कौतुक केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य नेमकं काय? वाचा सविस्तर...

जितेंद्र आव्हाडांकडून दिलीप वळसे पाटलांचं कौतुक; म्हणाले, त्यांच्यामुळेच देवेंद्र फडणवीस...
जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटीलImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 16, 2024 | 8:34 PM

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं तोंड भरून कौतुक केलंय. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं त्यांनी नाव घेतलंय. महाराष्ट्राचा विधानसभेचा अध्यक्ष हा दिलीप वळसे पाटील यांच्यासारखा असावा. आमचे त्यांचे मतभेद आहेत. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले ते म्हणजे दिलीप वळसे पाटील यांच्यामुळे झाले… 100% दिलीप वळसे पाटील हे स्पीकर असावेत, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. टीव्ही 9 मराठीशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केलं आहे. वेगळ्या पक्षात असतानाही आव्हाडांनी वळसे पाटलांचं कौतुक केलंय. याची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय.

लोकसभा अध्यक्षपदाबाबत काय म्हणाले?

महाराष्ट्रात जी पद्धत आहे पक्ष फोडण्याची तशी पद्धत केंद्रात अवलंबली जाणार आहे. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे कधी ना कधी खासदार फोडणार आहेत. सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कधीही निष्पक्ष वागले नाहीत. ते कायम एकतर्फी वागत आलेत. दोघे गुन्हेगार नाही दोघेही चुकले नाही, असा निर्णय त्यांनी दिला. मग सरकार पडलं. कसं याला उत्तर आहे का नाही? तसा जर अध्यक्ष लोकसभेत असेल तर लोकसभा संपली, असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

अजित पवारांवर निशाणा

मला प्रफुल पटेल बद्दल काय माहिती नाही. मात्र अजित पवार यांच्यावर दररोज हल्ले होत आहे. याला अजितदादा कारणीभूत आहेत. अजित पवार यांच्या येण्यामुळे सर्वांची हानी झाली आहे, असे म्हणत आहेत. तुमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं मोहीम सुरू झाली आहे आणि तुमच्यात एकही मर्दाची अवलाद नाही, त्याच्यासमोर उभे राहण्यासारखी..? तुमच्या पेक्षा आम्ही परवडलो. शरद पवार बाबत अजित पवार बोलले तर मी दुसऱ्या मिनिटाला उत्तर देतो. अख्ख्या भारतात कोणीही शरद पवार बाबत बोललं तर मी दुसऱ्या मिनिटाला उत्तर देतो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

अजित पवार यांना इतक घेरले असताना देखील अरगोनाईजर बाबत बोलताना भीती वाटत आहे का? अजित पवार यांना जाणीव झाली असेल आपण एकटे पडलो आहोत. स्वार्थी लोकच गद्दारी करतात. ज्यांच्या मनात स्वार्थ आहे ते गद्दारी करतात. ज्याच्या मनात स्वार्थ नाही ते निष्ठावंत असतात. मला किती वेळा धमकी आल्या विचार सोडायचं नसतो, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, अंगावर काटा येणारा व्हिडीओ पाहिला?
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, अंगावर काटा येणारा व्हिडीओ पाहिला?.
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी.
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?.
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.