लोकलमध्ये चढण्यावरुन प्रवाशाला मारहाण, कपाळावर तीन टाके

| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

कल्याण : लोकलमध्ये चढण्याच्या वादातून पुन्हा एकदा प्रवाशाला बेदम मारहाण झाली. ही घटना कल्याण रेल्वे स्टेशनवर घडली. याप्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या प्रवाशाला ताब्यात घेतले आहे. दिलीप माळी असं मारहाण झालेल्या प्रवाशाचं नाव आहे. दिलीप माळी हे रसायनी इथले रहिवासी आहेत. आज सकाळी भिवंडीला जाण्यासाठी ते दिव्याहून कल्याणकडे निघाले. मात्र लोकल कल्याण स्टेशनमध्ये शिरताच काही प्रवासी […]

लोकलमध्ये चढण्यावरुन प्रवाशाला मारहाण, कपाळावर तीन टाके
Follow us on

कल्याण : लोकलमध्ये चढण्याच्या वादातून पुन्हा एकदा प्रवाशाला बेदम मारहाण झाली. ही घटना कल्याण रेल्वे स्टेशनवर घडली. याप्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या प्रवाशाला ताब्यात घेतले आहे.

दिलीप माळी असं मारहाण झालेल्या प्रवाशाचं नाव आहे. दिलीप माळी हे रसायनी इथले रहिवासी आहेत. आज सकाळी भिवंडीला जाण्यासाठी ते दिव्याहून कल्याणकडे निघाले. मात्र लोकल कल्याण स्टेशनमध्ये शिरताच काही प्रवासी धावत्या लोकलमध्ये चढू लागले. यावेळी माळी आणि या प्रवाशांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच रवी बाविस्कर या प्रवाशाने माळी यांना मारहाण केली.

या मारहाणीत माळी यांच्या डोळ्याजवळ दुखापत झाली असून तीन टाके पडले आहेत. धक्कादायक म्हणजे बाविस्कर याने मारहाण करताना आपण पोलीस असल्याची बतावणी केली. मात्र नंतर तो खोटं बोलत असल्याचं उघड झालं. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी माळी यांची तक्रार घेऊन रवी बाविस्करला ताब्यात घेतलं आहे.

VIDEO: