कल्याणमध्ये टोइंग व्हॅन थेट ज्वेलर्सच्या दुकानात घुसली

ठाणे वाहतूक पोलिसांची टोइंग व्हॅन चालवत असताना चालकाला फीट आली आणि त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं.

कल्याणमध्ये टोइंग व्हॅन थेट ज्वेलर्सच्या दुकानात घुसली
| Updated on: Jan 30, 2020 | 2:52 PM

कल्याण : कल्याणमध्ये टोइंग व्हॅन ज्वेलरच्या दुकानात घुसून विचित्र अपघात घडला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी काही दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचं नुकसान झालं (Kalyan Towing Van Jewellery Shop) आहे.

कल्याणमधील मोहम्मद अली चौक परिसरात हा अपघात घडला. ठाणे वाहतूक पोलिसांची टोइंग व्हॅन चालवत असताना चालकाला अचानक फीट आली. त्यामुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं.

टोइंग व्हॅन फूटपाथच्या कडेला असलेल्या काही बाईक्सना धडकली. त्यानंतर ती थेट राजेंद्र ज्वेलर्सच्या दुकानावर जाऊन आदळली. यामध्ये कोणीही जखमी झालेला नाही, मात्र रस्त्यावर पार्क दुचाक्यांचं नुकसान झालं आहे.

व्हॅन भरधाव वेगाने फूटपाथच्या दिशेने येताना बघ्यांनाही हा नेमका काय प्रकार घडत आहे, हे काही क्षण समजलं नाही. राजेंद्र ज्वेलर्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही गोंधळ उडाला. अपघाताची घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद (Kalyan Towing Van Jewellery Shop) झाली आहे.