
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनजय मुंडे यांना काल मुंबई उच्च न्यायालयात धक्का बसला. कनिष्ठ न्यायालयाने करुणा मुंडे यांच्या प्रकरणातील कोर्टातील याचिका रद्द करावी यासाठी त्यांनी धाव घेतली होती. न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांनी करुणा मुंडेंच्या पोटगीतील ५० टक्के रक्कम देण्याचे निर्देश दिले. याविषयी करुणा मुंडे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. त्यांनी मुंडे हे वाईट लोकांच्या संगतीत असल्यानेच वारंवार चुकीचे निर्णय घेत असल्याचा दावा केला. पोटगी ३५ ते ४० लाख रुपये रक्कम असेल त्यातील अर्धी रक्कम कोर्टात जमा करायला सांगितले आहेत. म्हणजेच २१ ते २२ लाख रुपये रक्कम कोर्टात भरायला सांगितली आहे. आणि माझा मुलीची १०० टक्के रक्कम भरायला सांगितली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मला मालमत्ता विकायला लावली
धनंजय मुंडे यांना मला पैसे द्यायचे नाहीत. त्यामुळे ते कोर्टात गेले. माझ्याकडे ५० कोटी रुपयांची प्रॉपर्टी होती. ती मला विकायला लावली. निवडणुकीत माझं मंगळसूत्र देखील मी यांच्यासाठी गहाण ठेवले आणि पैसे धनंजय मुंडे यांना दिले होते, असे करुणा मुंडे म्हणाल्या. त्यांनी मुंडे यांच्यावर तोंडसुख घेतले. त्यांनी खालची याचिका रद्द करण्यासाठीच उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे त्या म्हणाल्या.
दलाल गँगमुळे मोठे नुकसान
धनंजय मुंडे यांना २७ वर्षांपासून मी ओळखते. त्यांना पैशांची काही गरज नाही. मात्र त्यांच्या मागे असलेली दलाल गैंग आहे त्यांच्यामुळे ते चुकीचे वागत आहेत. वाल्मिक कराड, तेजस ठक्कर यांच्यामुळे ते अडचणीत सापडले. या माणसांमुळेच ते चुकीचे पाऊल टाकत असल्याचा आरोप करूणा मुंडे यांनी केला. यापू्र्वी सुद्धा त्यांनी वाल्मिक कराडसह इतरांवर गंभीर आरोप केले होते.
कृष्णा आंधळेंचा खून झाला असेल
कृष्णा आंधळेचा खून झाला असेल. अजून तो सापडत नाही याचा अर्थ त्याचा खून झाला असणार, असा खळबळजनक दावा करुणा मुंडे यांनी केला. वाल्मिक कराडला येरवडा तुरुंगात पाठवा यासाठी माझे कार्यकर्ते अजित पवारांना सातत्याने निवेदन देत आहेत, असे त्या म्हणाल्या. त्या घाणेरड्या लोकांचे बॅनरवर फोटो आहेत त्यांना निवडून देऊ नका, असे आवाहन त्यांनी बीडच्या स्थानिक निवडणुकीविषयी केले.
मुंडे जोपर्यंत माझ्या सोबत ६ वर्ष याच घरात राहत होते. तोपर्यंत कांदा लसूण सुद्धा खत नव्हते. परंतु काही दलाल त्यांच्या सोबत आले आणि त्यानंतर आमच्यात फूट पडली. त्यांनी विचार करायला पाहिजे परंतु त्यांच डोकं कुठ गेलं काय माहीत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मुंडेंना आव्हान करते दलाल लोकांचे ऐकू नका. मी प्रेमिका म्हणून मुंडे सोबत राहत होते. मुंडे कोर्टात वाद घेऊन गेले मी कोर्टात गेले नव्हते. मला त्यांची प्रॉपर्टी किती आहे हे सुद्धा मला माहिती नव्हती. मुंडेंना आव्हान करते की निवडणुकींत माझ्याकडून घेतलेले पैसे मला परत करा. मुलीचे २६ लाख रुपये कोर्टात भराचे आहेत आणि माझे २२ लाख रुपये कोर्टात मुंडेंना भरायचे आहेत, अशी माहिती करुणा मुंडे यांनी दिली.