AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो पैसा परदेशात तर गेला नाही ना?, किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली शंका

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या घोटाळ्याचे पैसे अल्पेश आणि अजमेरा या दोन भावांनी वाटून घेतले आहेत.

तो पैसा परदेशात तर गेला नाही ना?, किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली शंका
| Edited By: | Updated on: Apr 01, 2023 | 5:23 PM
Share

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनीषा चौधरी यांनी दहिसर पश्चिमेतील कांदरपाडा परिसराला भेट दिली. यावेळी किरीट सोमय्या म्हणाले की, कालपर्यंत मनीषा चौधरी, गोपाळ शेट्टी आणि किरीट सोमय्या म्हणत होते, आज CAG म्हटले आहे की हा मुंबई महापालिकेचा मोठा घोटाळा आहे. त्याचा पैसा कुठे गेला. तो परदेशात तर गेला नाही ना? आयकर विभाग, ईडी, मुंबई पोलीस किंवा अँटी करप्शनने याची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी किरीट सोमय्या यांनी केली.

झोपडपट्टी घोषित होती

ही टाऊनशिप महाराष्ट्र सरकारने झोपडपट्टी म्हणून घोषित केली होती. SRA महापालिकेला द्यायला तयार होती. मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांची सत्ता होती. माफिया सेनेने हा प्रस्ताव 2 नोव्हेंबर 2019 ला फेटाळला. 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांनी 29 एप्रिल रोजी महापालिकेला ही जागा ताब्यात घेण्याचे आदेश दिले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

जबाबदार व्यक्तींवर कारवाई होणार

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या घोटाळ्याचे पैसे अल्पेश आणि अजमेरा या दोन भावांनी वाटून घेतले आहेत. 900 कोटींवरील घोटाळ्याला जो जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा विश्वास किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला.

मोजणीसुद्धा झालेली नाही

किरीट सोमय्या म्हणाले, ही जागा २ कोटी ५५ लाख रुपयांमध्ये मटकेवार परिवारकडून घेतली. त्यांचा आणि ठाकरे परिवाराने केलेला हा घोटाळा आहे. ३४९ कोटी रुपयांचे पेमेंट करून सव्वादोन वर्षे झालीत. मोजणीसुद्धा झालेली नाही. पुनर्वसन करायला हवं.

तर एकही पैसा खिशातून गेला नसता

महाराष्ट्र सरकारने झोपडपट्टी घोषित केले होते. ही जागा ताब्यात घेऊन मुंबई महापालिकेला देण्यात येणार होती. एकही पैसा खिशातून गेला नसता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांची सत्ता होती. माफिया सेनेने तो प्रस्ताव खारिज केला असल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला. खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार मनीषा चौधरी यांनीही यावेळी आपली मत मांडलीत.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.