भाजप नेते किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. (Kirit Somaiya submits complaint against CM uddhav thackeray)

भाजप नेते किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
भाजप नेते किरीट सोमय्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 7:52 PM

मुंबई: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती लपवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. (Kirit Somaiya submits complaint against CM uddhav thackeray)

किरीट सोमय्या यांनी ट्विट करून त्याबाबतची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची अलिबाग येथे 5 कोटीची संपत्ती आहे. त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी लपवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाचे महाराष्ट्र प्रतिनिधी बलदेव सिंह यांच्याकडे सोमय्या यांनी ही तक्रार केली आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांनी जाणूनबुजून ही संपत्ती लपवल्याचा दावा केला आहे. तसेच आम्ही केलेली तक्रार निवडणूक आयोगाच्या दिल्ली येथील मुख्यालयात पाठवण्याचं बलदेव सिंह यांनी आश्वासन दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

सोमय्यांनी ट्विट करून ठाकरे सरकारला घोटाळ्यांवरून घेरले आहे. मुख्यमंत्र्यांचे 19 बंगले, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीने जप्त केलेली 78 एकर जमीन, संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची भागिदारी असलेली महाकाली गुंफेची जमीन बिल्डराच्या घशात घालण्याचा डाव, मुंबई महापालिकेने दहिसर येथील 2.55 कोटीचा भूखंड बिल्डरला 349 कोटीला दिला, पाच हजार बेडवाल्या 12 हजार कोटीच्या रुग्णालयाच्या घोटाळ्याचे पुरावे मिळाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (Kirit Somaiya submits complaint against CM uddhav thackeray)

 

संबंधित बातम्या:

राज ठाकरेंचा रॉयल कारभार, सरकारने सुरक्षेत कपात करताच मनसेकडून ‘महाराष्ट्र रक्षक’ तैनात

राष्ट्रवादी पुरस्कृत ग्रामपंचायत उमेदवाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

दोन BMC आयुक्त हवेच, मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टोक्तीनंतरही अस्लम शेख ठाम

(Kirit Somaiya submits complaint against CM uddhav thackeray)