AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांना उद्या चौकशीला येण्यासाठी पोलिसांचा समन्स, INS Vikrant प्रकरणात राऊतांचे घोटाळ्याचे आरोप

भाजप नेते किरीट सोमय्यांना ट्रॉम्बे पोलिसांनी समन्स पाठवला आहे. त्यांना उद्या चौकशीला बोलावण्यात आलं आहे. INS विक्रांत घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी बोलावलं असल्याची माहिती समोर आली आहे. किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाने यात मोठा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांना उद्या चौकशीला येण्यासाठी पोलिसांचा समन्स, INS Vikrant प्रकरणात राऊतांचे घोटाळ्याचे आरोप
किरीट सोमय्या यांना चौकशीसाठी पोलिसांचा समन्सImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Apr 08, 2022 | 10:42 PM
Share

मुंबई :  भाजप नेते किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) ट्रॉम्बे पोलिसांनी समन्स पाठवला आहे. त्यांना उद्या चौकशीला बोलावण्यात आलं आहे. INS विक्रांत (INS Vikrant) घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी बोलावलं असल्याची माहिती समोर आली आहे. किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाने यात मोठा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यात वार पलटवार सुरू आहेत. संजय राऊत यांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप सुरूवातील किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला. त्यानंतर संजय राऊतांनी आक्रमक होत किरीट सोमय्या यांच्यावर घोटाळा केल्याचा पलटवार केला. किरीट सोमय्या आणि त्यांचे सुपुत्र नील सोमय्या हे जेलमध्ये जाणार हे संजय राऊत गेल्या अनेक दिवसांपासून सांगत आहेत.

राऊतांचे आरोप काय?

गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी आहे. गुरूवारी या प्रकरणातबाबत बोलतना राऊत म्हणाले होते, किरीट सोमय्यांनी पैसे गोळा केल्याचे स्पष्ट दिसतंय. त्यांचा मुलगा आणि दोघे मिळून 711 डबे गोळा केले आणि हे सर्व पैसे त्यांनी लाटले. त्याबरोबर राज्यभवन ही भाजपची शाखा आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांचे शाखाप्रमुख आहेत. तसेच राज्यपालांनी मला पत्र दिलं हे पैसे आम्हाला मिळाले नाहीत म्हणून, मग हे पैसे गेले कुठे? हे पैसे सोमय्या यांनी लाटले आहेत, असा थेट आरोप राऊतांनी केला आहे.

काय कारवाई होऊ शकते

58 कोटींवरुन राऊत आणि सोमय्यांमध्ये संघर्ष सुरु झालाय. INS विक्रांतला वाचवण्याच्या नावाखाली, सोमय्यांनी घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. आणि माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीनंतर सोमय्यांविरोधात मुंबईतल्या ट्रॉम्बे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. किरीट सोमय्यांसह त्यांचे पुल निल किरीट सोमय्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कलम 420, कलम 406 आणि कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय अशीही माहिती समोर आली आहे. कलम 420 अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास 7 वर्षांपर्यंत जेल होण्याची शक्यताही आहे. तसेच कलम 406 नुसार गुन्हा सिद्ध झाल्यास 3 वर्षांची शिक्षा आणि कलम 34 अंतर्गत पोलीस अटक वॉरंट शिवाय अटक करु शकते, अशा तरतुदी आहेत. त्यामुळे उद्या परत हे प्रकरण आता चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांकडून अटक, सरकारी कामात अडथळा, कटात सामील असल्याचा आरोप

ST Workers Agitation : गुणरत्न सदावर्तेंच्या अटकेची शक्यता, सदावर्तेंच्या घरी नेमकं काय घडलं? जयश्री पाटलांनी सांगितलं

St Worker Protest : एवढं धाडस येतं कुठून? आंदोलनामागचा मास्टरमाईंड शोधू, अजित पवारांचा इशारा कुणाला?

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?