Kishori Pednekar | वाढती कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक, मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता : किशोरी पेडणेकर

ओमिक्रॉन हा गंभीर स्वरुपाचा नाही, असं समजू नका. तसं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. त्याला गंभीर समजलं तर पुढे कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागणार नाही, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मुंबई : संपूर्ण लॉकडाऊन होणार नाही. पण काही नागरिक बेफिकीर राहिले तर आगामी काळात लॉकडाऊन करावा लागू शकतो. घाबरण्यापेक्षा काळजी घ्या. आपण प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बघत आहोत. डॉक्टर्स, बेस्टचे कर्मचारी कोरोनाबाधित होत आहेत. ओमिक्रॉन हा गंभीर स्वरुपाचा नाही, असं समजू नका. तसं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. त्याला गंभीर समजलं तर पुढे कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागणार नाही, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

Published On - 11:24 am, Fri, 7 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI