कोकणात जाणाऱ्या रेल्वे तुडूंब, वेळापत्रक कोलमडलं, ट्रेन 4 तास लेट

मुंबई : सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे प्रत्येकजण फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडत आहे. मात्र याचा परिणाम आता थेट कोकण रेल्वेवर झाला आहे. कोकणात जाणऱ्या रेल्वेच्या वेळापत्रकाचे तीनतेरा वाजले आहेत. मुंबईहून गोव्याच्या दिशेन जाणाऱ्या गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. हीच परिस्थिती मुंबई-पुणे महामार्गावरही दिसून येत आहे. सुट्ट्या आल्या की, मोठ्या संख्येने मुंबईकर बाहेर फिरण्यासाठी जातात. […]

कोकणात जाणाऱ्या रेल्वे तुडूंब, वेळापत्रक कोलमडलं, ट्रेन 4 तास लेट
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:34 PM

मुंबई : सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे प्रत्येकजण फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडत आहे. मात्र याचा परिणाम आता थेट कोकण रेल्वेवर झाला आहे. कोकणात जाणऱ्या रेल्वेच्या वेळापत्रकाचे तीनतेरा वाजले आहेत. मुंबईहून गोव्याच्या दिशेन जाणाऱ्या गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. हीच परिस्थिती मुंबई-पुणे महामार्गावरही दिसून येत आहे. सुट्ट्या आल्या की, मोठ्या संख्येने मुंबईकर बाहेर फिरण्यासाठी जातात. मात्र नेहमीप्रमाणे यावेळीही त्याला वाहतूक कोंडी आणि रेल्वेच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे नवीन समस्यांना सोमोरे जावे लागत आहे.

मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना तोबा गर्दी आहे. गाड्यांमध्ये गर्दी असल्यामुळे अनेक स्टेशनवर आलेल्या रेल्वे गाड्यांचे डब्बे आतमधील प्रवाशांनी बंद करून घेतले आहेत. त्यामुळे स्टेशनवर उभे असलेल्या अनेक प्रवाशांनी रात्री गोंधळ घातला. हा संपूर्ण प्रकार काल रात्री ठाणे आणि पनवेल स्टेशनवर घडला. संतप्त झालेल्या प्रवाशांनी अडवणूक केल्यामुळे अनेक रेल्वे गाड्या खोळंबल्या.

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या गाड्या तब्बल 4 तास उशिराने धावत आहेत. मडगावकडे जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेस तब्बल चार तास उशिराने धावतेय. तर सीएसएमटी करमाळी हिवाळा विशेष ट्रेन दोन तासाहून अधिक उशिराने धावत आहे. मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यासुद्धा 2 तासापर्यंत उशिराने धावत आहेत. गाड्या उशिरा धावत असल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रत्येक रेल्वेला याचा फटका बसला आहे.

मुंबईवरुन गोव्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या

  •  कोकणकन्या एकस्प्रेस (4 तास उशिरा)
  • सीएसएमटी करमाळी हिवाळी स्पेशल ट्रेन (2 तास उशिरा)
  • मरू सागर एक्सप्रेस (1 तास उशिरा)
  • राजधानी एकस्प्रेस (30 मिनिटे उशिरा)
  • दिवा सावंतवाडी (44 मिनिटे उशिरा)
  • तुतारी (1 तास 45 मिनिटे उशिरा)

गोव्यावरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या

  •  मडगाव लोकमान्य डब्बल डेक्कर (1 तास उशिरा)
  • नेत्रावती (1 तास 37 मिनिटे उशिरा)
  • मंगला एकस्प्रेस (2 तास उशिरा)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें