AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Water Cut : मुंबईच्या ‘या’ आज सकाळी पाणी पुरवठा बंद राहणार! पाईपलाईन फुटल्यानं पाणी पुरवठ्यावर परिणाम

Mumbai Water Cut News : दादरमधील एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागात पाणीपुरवठा करणाऱ्या जलावाहिनीला गळती लागली आहे.

Mumbai Water Cut : मुंबईच्या 'या' आज सकाळी पाणी पुरवठा बंद राहणार! पाईपलाईन फुटल्यानं पाणी पुरवठ्यावर परिणाम
पाण्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट...Image Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jul 08, 2022 | 6:59 AM
Share

मुंबई : (Dadar) दादरमधील पारसी जिमखान्यासमोर (The channel burst) जलवाहिनी फुटल्याने आज (शुक्रवारी 8 जुलै रोजी) एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये सकाळी पाणीपुरवठा होणार नाही. जलवाहिनेचे काम सुरु असले तरी सकाळच्या सत्रातला (Water supply stopped) पाणीपुरवठा होणार नसल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. दादर (पूर्व) मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पारसी जिमखाना समोर 1 हजार 200 मिमी व्यासाची न्यू तानसा जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे पहाटे 4 ते सकाळी 10 पर्यंत या भागात पाणी पुरवठा होणार नाही.

जलवाहिनी फुटल्याने ओढावली परस्थिती

दादरमधील एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागात पाणीपुरवठा करणाऱ्या जलावाहिनीला गळती लागली आहे. जलवाहिनी फुटल्याचे निदर्शनास येताच मनपाच्यावतीने दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र असे असतानाही एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा करता येणार नाही. अचानक जलवाहिनी फुटल्याने ही परस्थिती ओढावली आहे.

या भागा होणार नाही पाणीपुरवठा

एफ / उत्तर विभागातील दादर पूर्व, माटुंगा, वडाळा, पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी तर एफ/दक्षिण विभागातील दादर, नायगाव, लालबाग, वडाळा, परळ, काळाचौकी, शिवडी येथे पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेने सांगितले आहे. पहाटे 4 ते सकाळी 10 च्या दरम्यान या भागात पाणीपुरवठा केला जातो. मात्र, 1 हजार 200 मिमी व्यासाची गळती लागली आहे.

महापालिकेचे काय आहे आवाहन?

पाईपलाईनला गळती लागताच दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. मात्र, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्याने पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा पुर्ववत करण्यात येणार आहे.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार