Ganesh Chaturthi LIVE: राज्यभरात गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन

राज्यभरात गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर आणि कोकणातही गणपती बाप्पांच्या आगमनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळपासूनच वाजतगाजत गणपती बाप्पांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे.

Ganesh Chaturthi LIVE: राज्यभरात गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन
दरवर्षी ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत चिंतामणीचं आगमन होत असल्याने गणेशभक्तांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.
Follow us
| Updated on: Sep 02, 2019 | 12:24 PM

मुंबई : राज्यभरात गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर आणि कोकणातही गणपती बाप्पांच्या आगमनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळपासूनच वाजतगाजत गणपती बाप्पांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे.

LIVE Updates:

  • माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे आपल्या घरात साध्या पध्दतीने भक्तीपूर्ण वातावरणात गणेशमुर्तीची प्रतिष्ठापणा केली. राज्यावर आलेले अर्थिक मंदीचं संकट दूर व्हावं, अशी प्रार्थना त्यांनी गणेश चरणी केली. महाराष्ट्रावरील सामाजिक संकट दूर व्हावे, असंही साकडं चव्हाण यांनी बाप्पाला घातलं.
  • मुंबईच्या ग्रांटरोड येथील शास्त्री हॉल गणेश मंडळाच्या गणपतीचं पारंपारिक पद्धतीने आगमन झालं आहे. या गणपतीचं पालखीतून आगमन करण्यात झालं.
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा झाली. देशात ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा आणि देशाला नाॅलेज पाॅवर म्हणून जगात मान्यता मिळावी अशी गडकरींनी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली.
  • मुंबईतील प्रसिध्द गणपती लालबागच्या राजाच्या दर्शनाला सकाळपासून सुरुवात झाली आहे. यंदा लालबागच्या राजाच्या चरणी चंद्रयान 2 चा देखावा साकारण्यात आला आहे.

मुंबई

मुंबईत अनेक सार्वजनिक गणेश मंडळं आहेत, पण यात जी एस बी सेवा मंडळानं आपलं वेगळेपण राखलं आहे. या ठिकाणी बाप्पा सोन्यानं सजलेलं पाहायला मिळतात. येथील बाप्पांच्या मूर्तीला सजवण्यासाठी यंदा 70 किलोच्या जवळपास सोनं वापरण्यात आलं आहे. या मंडळाचं यंदा 65 वं वर्ष आहे. या 5 दिवसात 65 हजाराहून अधिक पूजा केल्या जातात.

पुणे

पुण्यातही गणोशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पुणेकरांचे ग्रामदैवत अर्थात पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीची सकाळी 11:40 वाजता प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. योगी एम. यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठाना केली जाईल. यावेळी त्यांच्याच हस्ते विविध क्षेत्रातील पाच मान्यवरांना कसबा पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची मिरवणूक मुख्य मंदिरापासून सकाळी साडेआठ वाजता निघणार आहे. ही मिरवणूक आप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मार्गे उत्सव मंडपात जाणार आहे. या मिरवणुकीमध्ये दरबार बँड, प्रभात बँड, देऊळकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधू सनई वादन अशी वाद्यांची दमदार हजेरी असणार आहे. मंडळाने यावर्षी “श्री गणेश सूर्य मंदिर” देखावा उभारला आहे.

लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या पुण्यातील केसरी वाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठा दुपारी 12:30 वाजता होणार आहे. हा पुण्यातील पाचवा मानाचा गणपती आहे. या गणेशोत्सवाचं यावेळी 126 वं वर्ष सुरू आहे.

नाशिक

नाशिकमध्ये देखील गणपती बाप्पाचं उत्साहात आगमन होत आहे. बाप्पाच्या पूजेसाठी लागणाऱ्या दुर्मिळ वनस्पती, पुजासाहित्य, आजच्या दिवशी नैवेद्यासाठीच्या 21 भाज्या खरेदी करण्यासाठी नाशिककर गर्दी करत आहेत.

नागपूर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात देखील प्रचंड उत्साहात गणरायाचे आगमन होत आहे. ‘नागपूरचा राजा’ नागपूर शहरातील मानाचा गणपती आहे. नागपूरच्या राजाचं यंदाचं चोवीसावं वर्ष आहे. नागपूरच्या राजाला दरवर्षी सोन्याचे अलंकार चढवले जातात.
स्थापनेचा मुहूर्त यंदा सकाळचा असल्याने नागपूरच्या अनेक सोसायट्यांमध्ये सकाळपासूनच गणपती मूर्तीचे आगमन झाले. वाडी परिसरात ढोल ताशांच्या गजरात, नाचत गाजत, मराठमोळ्या पद्धतीने मिरवणूक काढून गणरायाचे स्वागत करण्यात आले. महिला, पुरुष, युवा आणि लहान मुले मोठ्या उत्साहाने गणरायाच्या स्वागताच्या मोहिमेत सहभागी झाले.

डोक्यावर भगवे फेटे आणि मुखात गणपती बाप्पा मोरयाचा गजर अशा वातावरणात गणपतीची मूर्ती आणली गेली. सकाळी पूजन करून मुहूर्त साधत श्रींच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी अनेक ठिकाणी सकाळीच गणेश मूर्ती आणली गेली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर नागपूर शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कोकण

संपूर्ण कोकणात गणपती बाप्पा मोरयाचा गजर सुरू झाला आहे. गणेशाच्या स्वागतासाठी गणेशभक्त आतूर झाल्याचं चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. सकाळपासूनच श्रींच्या आगमन मिरवणुका ढोल-ताशांच्या गजरात सुरू झालं आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण भक्तिमय झालं आहे. लहान मुलांसह सर्वच गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.

कोकणातील गुहागर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात आजही पारंपरिक पद्धतीने गणरायाला डोक्यावरून आणलं जातं. कोकणातील वाडी-वस्तीवर पारंपरिक पद्धतीने गणपती डोक्यावर घेऊन शेताच्या बांधावरून गणपतीचे आगमन होतानाचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.

पाट डोक्यावर ठेवून त्यावर गणपती विराजमान होतो. ढोल ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या गणरायाला डोक्यावर घेवून घरी आणलं जातं आणि गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.