AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Local Megablock : शनिवारी रात्री आणि रविवारी हार्बर आणि मध्ये रेल्वेचा मेगाब्लॉक, कधी सुरू? कधी संपणार? वाचा एका क्लिकवर

21/22.5.2022 रोजी (शनिवार/रविवार मध्यरात्री) मुख्य मार्गावर रात्रीचा मेगा ब्लॉक तसेच हार्बर मार्गावर रविवार दि. 22.5.2022 रोजी मेगा ब्लॉक असणार आहे. अशी माहिती रेल्वेकडून पत्रक काढून देण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना या वेळा पाहून पर्यायी वेळेचा आणि पर्यायी मार्गाच अवलंब करावा लागणार आहे.

Local Megablock : शनिवारी रात्री आणि रविवारी हार्बर आणि मध्ये रेल्वेचा मेगाब्लॉक, कधी सुरू? कधी संपणार? वाचा एका क्लिकवर
LocalImage Credit source: twitter
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: May 20, 2022 | 8:47 PM
Share

मुंबई : मुंबईची लोकल (Mumbai Local Train) म्हणजे मुंबईकरांची आणि उपनगरातील लोकांची लाईफलाईन आहे. रोज लाखो प्रवासी या लोकलने प्रवास करतात. सर्वसामान्य मुंबईकर, व्यवसायिक, नोकरी करणारे चाकरमानी लोकलनेच आपल्या कामच्या ठिाकणी पोहचतात. ही लोकल अगदी काही मिनिटं जरी बंद झाली तरी चाकरमान्यांचं वेळापत्रक (Local Timetable)  कोलमडत. शनिवारी रात्री रेल्वेकडून दुरूस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आलाय. तसेच रविवारी असणाऱ्या मेगाब्लॉकचे (Local Mega block) वेळापत्रकही रेल्वेकडून देण्यात आलंय.21/22.5.2022 रोजी (शनिवार/रविवार मध्यरात्री) मुख्य मार्गावर रात्रीचा मेगा ब्लॉक तसेच हार्बर मार्गावर रविवार दि. 22.5.2022 रोजी मेगा ब्लॉक असणार आहे. अशी माहिती रेल्वेकडून पत्रक काढून देण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना या वेळा पाहून पर्यायी वेळेचा आणि पर्यायी मार्गाच अवलंब करावा लागणार आहे.

कसा असेल मेगाब्लॉक?

मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. 22.5.2022 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक चालवणार आहे. दि. 21.5.2022 रोजी रात्री 11.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत भायखळा- माटुंगा अप जलद मार्गावर आणि सकाळी 00.40 ते 5.40 पर्यंत भायखळा- माटुंगा दरम्यान डाउन जलद मार्गावर. सकाळी ५.२० वाजता ची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी डाउन जलद सेवा भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन आपल्या वेळापत्रकानुसार थांब्यांवर थांबेल आणि गंतव्यस्थानावर 10 मिनिटे उशिराने पोहोचेल.

दि. 21.5.2022 रोजी रात्री 10.58 ते रात्री 11.15 पर्यंत ठाण्याहून सुटणारी अप जलद सेवा माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवली जाईल, या गाड्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील आणि गंतव्यस्थानावर 10मिनिटे उशिराने पोहोचतील. पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत ठाणे-वाशी/नेरुळ आणि बेलापूर/नेरुळ-खारकोपर सेवा प्रभावित राहणार नाहीत) पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत खारकोपर आणि बेलापूर/नेरुळ दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष उपनगरीय गाड्या धावतील. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, यामुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे, असे पत्रक रेल्वेने काढले आहे.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं