LPG Shortage: राज्यात धडाधड कारवाई, तुमचा गॅस चोरतोय कोण? हे व्यावसायिक रडारवर, इतक्या जणांवर ॲक्शन

Domestic LPG Cylinder Commercial Use: घरगुती गॅसचा व्यवसायासाठी वापर करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. देशात अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्यात आला आहे. त्याआधारे राज्यात पुरवठा विभागाने धडाधड कारवाई सुरू केली आहे. इतक्या जणांविरोधात ॲक्शन घेण्यात आली आहे.

LPG Shortage: राज्यात धडाधड कारवाई, तुमचा गॅस चोरतोय कोण? हे व्यावसायिक रडारवर, इतक्या जणांवर ॲक्शन
एलपीजी सिलेंडर व्यावसायिक वापर
Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Mar 13, 2026 | 11:08 AM

Domestic LPG Cylinder Commercial Use: एकीकडे राज्यात घरगुती गॅस सिलेंडर मिळवा यासाठी नागरीक लांबच लांब रांगामध्ये उभे ठाकले आहे. भर उन्हात अबालवृद्ध आणि महिलांना गॅस एजन्सीबाहेर सिलेंडर नोंदणीसाठी उभे राहावे लागत आहेत. तीन चार तास रांगेत उभे राहिल्यानंतर सिलेंडर मिळत असल्याची ओरड नागरीक करत आहेत. त्यातच एलपीजी सिलेंडरचा काळाबाजार आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी राज्यभरात पुरवठा विभागाने धडाधड कारवाई सुरू केली आहे. घरगुती गॅसचा व्यावसायिक कारणासाठी वापर होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली आहे.

पूर्णामध्ये 11 सिलेंडर जप्त, पुरवठा विभागाकडून कारवाई

व्यावसायिक गॅसचा परभणी जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाल्यानंतर आता घरगुती गॅस व्यवसायासाठी वापर करणाऱ्या तीन व्यावसायिकांवर पुरवठा विभागाने पूर्णा येथे कारवाई केली आहे. 3 व्यावसायिकांकडून 11 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यात इतर ठिकाणी सुद्धा भरारी पथकांची धडक कारवाई सुरू आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. तर कुठेही असा प्रकार आढळल्यास थेट तक्रार करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हॉटेलवर छापेमारी, 28 सिलेंडर जप्त

बीड जिल्ह्यात घरगुती गॅसचा वापर हॉटेलसाठी केला जात असल्याची बाब समोर आल्यानंतर आता महसूल प्रशासनाने 19 पथकं नियुक्त केले असुन 203 ठिकाणी तपासणी करण्यात आली यामध्ये 28 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये घरगुती गॅसचा अवैध वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले. यातील तीन हॉटेल चालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून इतरांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बीड जिल्ह्यात पेट्रोल डिझेल व घरगुती गॅसचा पुरेसा साठा असून पुरवठा सुरळीत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अंबडमध्ये धडक कारवाई, ९ घरगुती गॅस सिलिंडर जप्त

जालन्यातील अंबड तालुक्यात पुरवठा विभागाने अवैध गॅस वापरांविरोधात धडक मोहीम राबवत ९ घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले.जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर आणि तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक किरणकुमार खांडेभराड यांच्या पथकाने शहरातील हॉटेल,रेस्टॉरंट व व्यावसायिक आस्थापनांची अचानक तपासणी केली.यावेळी व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलिंडर वापर होत असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी ‘जीवनावश्यक वस्तू कायद्या’अंतर्गत ९ सिलिंडर जप्त करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.दरम्यान, पथकाने तालुक्यातील ३ पेट्रोल पंपांचीही तपासणी करून साठा, विक्री नोंदी आणि इंधन वितरणाबाबत सूचना दिल्या.घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Follow Us