ठाकरे सरकार स्थिर की अस्थिर?; संजय राऊत म्हणतात, विरोधकांना मनोमन खात्री पटली

| Updated on: Sep 11, 2021 | 11:47 AM

ठाकरे सरकार केव्हाही कोसळेल अशा वावड्या विरोधकांकडून वारंवार उठवल्या जात आहेत. विरोधकांचे हे दावे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावले आहेत. (Maha Vikas Aghadi govt is strong and stable, says sanjay raut)

ठाकरे सरकार स्थिर की अस्थिर?; संजय राऊत म्हणतात, विरोधकांना मनोमन खात्री पटली
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Follow us on

मुंबई: ठाकरे सरकार केव्हाही कोसळेल अशा वावड्या विरोधकांकडून वारंवार उठवल्या जात आहेत. विरोधकांचे हे दावे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावले आहेत. ठाकरे सरकार स्थिर आहे. आम्ही इंचभरही हे सरकार हलू देणार नाही. याची विरोधकांनाही मनोमन खात्री पटली आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. (Maha Vikas Aghadi govt is strong and stable, says sanjay raut)

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना हा टोला लगावला. वाद-विवाद कसले आहेत. मला तर काही वाद विवाद दिसत नाही. सरकार अस्थिर आहेत असं काही मोजके लोकं म्हणत आहेत. त्यांच्या मनातील भीती आणि वैफल्य ते बोलून दाखवत आहेत. जेव्हा ते वारंवार म्हणतात सरकार अस्थिर आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांना सरकार हलवता येणार नाही. ते पक्कं आणि स्थिर आहे. राज्यातील जे प्रमुख विरोधी पक्षाचे नेते आहेत, त्यांनाही मनोमन खात्री पटली आहे की काही झालं तरी पुढील तीन वर्षे हे सरकार अजिबात इंचभर सुद्धा इकडे तिकडे हलणार नाही आणि आम्ही सुद्धा हलू देणार नाही, असं राऊतांनी स्पष्ट केलं.

केंद्राच्या गाईडलाइन्स आहेत

राऊतांनी अलिबाग येथील घरी गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या वर्षीही आम्ही अत्यंत साधेपणाने गर्दी न करता हा ऊत्सव साजरा केला. अलिबागला तर लोक कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळत आहेत. उत्साह मनात असतोच. मी अलिबागला गणपतीसाठी गेलो होतो. तिथे पाहिलं की लोकांनी घरातच गणेशोत्सव साजरा केला. गर्दीवर निर्बंध आहेत. लोकांना जमण्यावर निर्बंध आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत, केंद्राच्या गाईडलाईन्स आहेत, त्यामुळे या निर्बंधांचं पालन करायला हवं, असं त्यांनी सांगितलं.

अनेकांना सुबुद्धी दे

गणपतीकडे काय मागणार, नेहमीच सगळ्यांना सुखी ठेवा, सगळ्यांना सुबुद्धी द्या, अनेकांना सुबुद्धीची गरज आहे. ती गणपतीकडे मागतो. सातत्याने विघ्न कोसळतंय. आपण सगळे कार्यक्रम एका बंधनात साजरे करतोय किंवा करतच नाही. पुढल्या वर्षी गणेश उत्सव साजरं करू, वाजत गाजत गणरायाचं आगमन करू, असं ते म्हणाले.

जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे

उत्सवाबाबत मागणी होत असते, केरळमध्येही ओनमवेळी लोक कोरोना संक्रमित झाले. 30 ते 35 हजार लोक संक्रमित होत आहेत. महाराष्ट्रावर ही वेळ येऊ नये. त्यामुळे विरोधकांनी मागणी करताना जनतेच्या हिताची आणि आरोग्याची काळजी घेतली पाहीजे, असंही ते म्हणाले.

राजकारणात केवळ विरोधासाठी नाही

सण-उत्सव करण्यासाठी माणसे जगली पाहीजेत. त्यांचे आरोग्य नीट राहिलं पाहिजे. राजकारणारत आहोत हे केवळ विरोध करण्यासाठी नाही तर लोकांची काळजी करण्यासाठी आहोत. त्यांचा जीव जपण्यासाठी आहोत. हे विरोधकांनी लक्षात घेतलं पाहीजे, असा सल्लाही त्यांनी दिला. (Maha Vikas Aghadi govt is strong and stable, says sanjay raut)

 

संबंधित बातम्या:

‘त्या’ रस्त्याच्या कामात अडथळे आणणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा; महापौर नरेश म्हस्केंचे आदेश

विजय वडेट्टीवारांनी केली महाज्योती संस्थेची ‘येड्याची जत्रा आणि खुळ्यांची चावडी’; गोपीचंद पडळकरांची जोरदार टीका

बाप सरपंच असला तरी पोर बोलतं हवा फक्त आपलीच! अमित ठाकरेंचा साधेपणा दाखवणारा फोटो व्हायरल

(Maha Vikas Aghadi govt is strong and stable, says sanjay raut)