सरकार ऐकलंत का? राज्याच्या मुख्य सचिवांनी कोरोना लसीचा पहिला डोस डिसेंबरमध्ये घेतला? चक्रवर्ती म्हणतात, पर्सनल चॉईस

| Updated on: Dec 04, 2021 | 9:59 AM

केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीनं कोरोना लसीकरणासाठी (Corona Vaccination) जोरदार मोहीम राबवली जात आहे. प्रशासनाच्या वतीनं लस न घेणाऱ्यांचे पगार रोखण्यात आलेले आहेत.

सरकार ऐकलंत का? राज्याच्या मुख्य सचिवांनी कोरोना लसीचा पहिला डोस डिसेंबरमध्ये घेतला? चक्रवर्ती म्हणतात, पर्सनल चॉईस
देबाशिष चक्रवर्ती
Follow us on

मुंबई: केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीनं कोरोना लसीकरणासाठी (Corona Vaccination) जोरदार मोहीम राबवली जात आहे. प्रशासनाच्या वतीनं लस न घेणाऱ्यांचे पगार रोखण्यात आलेले आहेत. सर्वसामान्य जनतेचं राशन बंद करण्यात आलेलं आहे. वाशिम (Washim) जिल्ह्यात आता थेट दंड वसुली सुरु करण्यात आलीय. सरकारी पातळीवर प्रशासनाकडून हे सर्व सुरु असताना राज्याचे प्रभारी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती (Debashish Chakrabarty) यांनी गुरुवारी (2 डिसेंबर) रोजी लस घेतल्याचं समोर आलं आहे. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं प्रभारी मुख्य सचिवांच्या लसीकरणाविषयी वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मी कधीही लस घेऊ शकतो, ही पर्सनल चॉईस असल्याचं मत देबाशिष चक्रवर्ती यांनी व्यक्त केलं आहे.

लसीकरण सुरु झाल्यानंतर 10 महिन्यांनी लस

राज्याचे माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे निवृत्त झाल्यानंतर वरिष्ठ अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांना प्रभारी मुख्य सचिव पदाचा कार्यभार देण्यात आलेला आहे. चक्रवर्ती यांनी गुरुवारी (2 डिसेंबरला) कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. केंद्र सरकारनं कोरोना लसीकरण मोहीम जानेवारी महिन्यात सुरु केली होती. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोना लस देण्यात आली होती. मात्र, प्रभारी मुख्य सचिव यांनी मोहीम सुरु झाल्यानंतर तब्बल 10 महिन्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.

लस कधी घ्यायची?, ती पर्सनल चॉईस

देबाशिष चक्रवर्ती यांनी टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये कोरोना लस कधीही घेऊ शकतो. हे सर्व प्रत्येकाच्या वैयक्तिक चॉईसचे मुद्दे आहेत किंवा आरोग्य विषयक बाबी देखील असू शकतात, असं देबाशिष चक्रवर्ती म्हणाले आहेत. राज्याचे प्रभारी मुख्य सचिव म्हणून देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडे जबाबदारी असल्यानं त्यांना 22 ते 28 डिसेंबर या कालावधीमध्ये होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित राहावं लागणार आहे.

इतर बातम्या:

Washim : लस न घेणाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 38 जणांकडून दंड वसूल, दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई होणार

Raigad: राष्ट्रपतींचं हेलिकॉप्टर होळीच्या माळावर उतरणार, शिवप्रेंमीनी आक्षेप का घेतलेला? नेमकं कारण काय

Maharashtra acting Chief Secretary Debashish Chakrabarty take Covid vaccine first jab on 2 December