अखेर ठरलं! विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 28 डिसेंबर रोजी; नवा अध्यक्ष कोण? राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं

| Updated on: Dec 24, 2021 | 11:07 AM

अखेर येत्या आठवड्याभरात विधानसभेला नवा अध्यक्ष मिळणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

अखेर ठरलं! विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 28 डिसेंबर रोजी; नवा अध्यक्ष कोण? राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं
maharashtra assembly
Follow us on

मुंबई: अखेर येत्या आठवड्याभरात विधानसभेला नवा अध्यक्ष मिळणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 28 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी बाजी मारतात की विरोधक याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आज सकाळी कामगार सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम ठरला. येत्या 28 डिसेंबर रोजी आवाजी मतदानाने ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी येत्या 27 डिसेंबर रोजी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे नव्या अध्यक्षाच्या निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आवाजी मतदानामुळे एकतर्फी निकाल?

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने नियमावलीत बदल केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतदाना ऐवजी आवाजी मतदानाने यंदा निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. आमदारांना फोडण्यात विरोधक यशस्वी ठरल्यास सरकार डळमळीत होऊ शकतं. त्यामुळे विरोधकांचा आत्मविश्वास वाढून सरकार पाडण्यासाठीच्या हालचालीही होऊ शकतात. त्यामुळेच नियमावलीत बदल केला असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

थोपटे, चव्हाण, राऊत यांची नावे चर्चेत

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत काँग्रेसकडून तीन नावे आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विद्यमान ऊर्जा मंत्री नितीन राऊत, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत. त्या सर्वाधिक चर्चा थोपटे यांच्या नावाची आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीतून नापसंती आहे. तर, राऊत यांना ऊर्जा खातं सोडायचं नाहीये. तसेच अशोक चव्हाण यांनाही अध्यक्षपदामध्ये फारसा रस नसल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे थोपटे यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची सूत्रे देण्याचं काँग्रेसमध्ये घटत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

गेल्या दोन दिवसापासून काँग्रेसच्या काही नेत्यांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पाठोपाठ नितीन राऊतही दिल्लीत होते. विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा सोडवण्यासाठी हे नेते दिल्लीत गेले होते, असं सांगितलं जात आहे.

 

संबंधित बातम्या:

लोकशाहीचे रक्षक असाल तर अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवा, सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

गरज भासल्यास परळीतून धनंजय मुंडेंविरुद्ध निवडणूक लढणार, करुणा मुंडे यांचा पवित्रा, शिवशक्ती सेना पक्षाची घोषणा!

Accident: लग्नाचे कपडे विसरले म्हणून माघारी फिरला, कारचा वेग ताशी 110, औरंगाबादेत लग्नघरी शोककळा!