Accident: लग्नाचे कपडे विसरले म्हणून माघारी फिरला, कारचा वेग ताशी 110, औरंगाबादेत लग्नघरी शोककळा!

Accident: लग्नाचे कपडे विसरले म्हणून माघारी फिरला, कारचा वेग ताशी 110, औरंगाबादेत लग्नघरी शोककळा!
अपघातात मृत पंकज सैंदाणे, प्रतिभा सैंदाणे आणि सुजाता हिवरे

लहान भावाच्या लग्नासाठी भुसावळहून औरंगाबादला निघालेल्या कारचा दुर्दैवी अपघात झाला. यात नवरदेवाचा मोठा भाऊ, चुलत बहीण आणि ब्युटीशियन अशा तिघांचा मृत्यू झाला. तर कारमधील अन्य दोन महिला गंभीर जखमी आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Dec 24, 2021 | 10:22 AM

औरंगाबादः भुसावळहून औरंगाबादला निघालेल्या एका कारला गुरुवारी सकाळी जामनेर टाकळीदरम्यान भीषण अपघात झाला. धाकट्या भावाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या या कारमध्ये नवरदेवाचा मोठा भाऊ, चुलत बहीण आणि ब्युटीशियन अशा तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर कारमधील अन्य दोन महिला गंभीर जखमी आहेत. सुदैवाने या अपघातात 10 महिन्याचे बाळ बचावले.

लग्नाचे कपडे घरी विसरल्याने फिरला होता माघारी

भुसावळमधील गोविंदा सैंदाणे यांचा मोठा मुलगा पंकज हा जयपूर येथे राहतो तर लहान मुलगा पुण्यात अभियंता आहे. शुक्रवारी औरंगाबादेतील मथुरा लॉन्समध्ये राजनचा विवाह ठरला होता. गुरुवारी सायंकाळी हळद समारंभ असल्याने सकाळीच भुसावळहून वऱ्हाडी चार वाहनांतून रवाना झाले. मोठा भाऊ पंकज सैंदाणे इंडिगो कारने निघाला. मात्र लग्नासाठीचे कपडे घरीत राहिल्याने तो माघारी फिरला होता. कपडे सोबत घेतल्यानंतर पुन्हा औरंगाबादकडे येताना जामनेरजवळ अज्ञात ट्रकने त्याच्या कारला धडक दिली. या अपघातात पंकज, चुलत बहीण पर्तिभा आणि ब्युटिशियन सुजाता हिवरे हे तिघे ठार झाले. त्यामुळे लग्नघरात शोकाकूल वातावरण झाले. तसेच नवरदेवाची वहिनी हर्षदा सैंदाणे, नेहा अग्रवाल हे जखमी झाले.

कारचा वेग नियंत्रणात असता तर…

लग्नासाठी भुसावळहून कार घेऊन निघालेल्या पंकज सैंदाणे याच्या कारचा वेग ताशी 110 किमी एवढा होता. अपघात स्थळाला भेट दिल्यानंतर पोलिसांनी ही माहिती दिली. यावेळी कारचा वेग नियंत्रणात असता तर हा अपघात टळला असता, असा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.

इतर बातम्या-

अवकाळीमुळे आंबा बागांचे नुकसान आता वाढत्या थंडीचा काय होणार परिणाम? शेतकऱ्यांचे लक्ष वातावरणाकडे

हार्बरवरच्या एसीलोकल गुंडाळल्या जाणार? सेंट्रलवर फेऱ्या वाढवण्याची घोषणा, नव्या वर्षात नवे बदल


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें