AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…तर सुनावणी घेणं अवघड होईल’, विधानसभा अध्यक्षांनी इतकं मोठं वक्तव्य का केलं?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावार आज सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी शिंदे गटाचे वकील महेश जेठलमानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची फेरसाक्ष घेतली. पण या प्रक्रियेला बराच वेळ लागला. अजूनही प्रभू यांची साक्ष नोंदवण्याचं काम पूर्ण झालं नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी नाराजी व्यक्त करत मोठं वक्तव्य केलं.

'...तर सुनावणी घेणं अवघड होईल', विधानसभा अध्यक्षांनी इतकं मोठं वक्तव्य का केलं?
rahul narvekarImage Credit source: tv9 marathi
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 22, 2023 | 5:45 PM
Share

गिरीश गायकवाड, Tv9 मराठी, मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी यावेळी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवली. विधानसभा अध्यक्षांसमोर महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना व्हीपशी संबंधित घडामोडींवर प्रश्न विचारले. जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना अनेक प्रश्न विचारुन घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या काही उत्तरावर जेठमलानी यांनी आक्षेपही घेतला. यावेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत आणि जेठमलानी यांच्यात खडाजंगी झाली. जेठमलानी यांनी विचारलेल्या प्रश्नांवरुन सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अशा प्रश्नांपासून संरक्षण मिळावं, अशी मागणी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली.

“ज्या गतीने सुनावणी सुरू आहे त्यावर विधानसभा अध्यक्षांची नाराजी व्यक्त केली. माझ्याकडे सुनावणीसाठी फक्त 16 दिवस आहेत. त्यात या प्रकरणाची सुनावणी संपवून निर्णय घ्यायचा आहे. पण सुनावणी ज्या गतीने पार पडत आहे ते पाहता या प्रकरणाची सुनावणी 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करणं अवघड आहे”, असं विधानसभा अध्यक्ष म्हणाले.

सुनावणीतील सवाल-जवाब

जेठमलानी – 21 जून 2021 रोजी जारी कथितरित्या जारी केलेल्या व्हीपवर आपली स्वाक्षरी आहे का?

सुनील प्रभू – इथे माझं नाव लिहिलं आहे. मग ती सही माझीच असणार ना? ही माझीच सही आहे. माझी खोटी सही कोण करेल?

जेठमलानी – 21 जूनला जारी केलेल्या व्हीपवर केलेली स्वाक्षरी आणि प्रतिज्ञा पत्रावर केलेली स्वाक्षरी ही वेगळी दिसतीय. आपल्या दोन स्वाक्षरी आहेत का?

प्रभू हो, माझ्या दोन सह्या आहेत. सही मी पूर्ण करताना S W Prabhu अशी करतो आणि शॉर्टमध्ये करताना SP अशी सही करतो. मी विधिमंडळ सदस्य आणि व्हीप म्हणून आतापर्यंत ज्या सह्या केल्या आहेत त्या सारख्या आहेत.

जेठमलानी – 21 जून 2022 आधी आपण किती लिखित व्हीप जारी केले आहेत ?

प्रभू – मला जे स्मरणात आहे त्यानुसार या कार्यकाळात दोन निवडणूका लागल्या. एक राज्यसभेची आणि एक विधान परिषदेची. दोन्ही निवडणुकीचे व्हीप मी यापूर्वी जारी केले आहेत.

जेठमलानी – आपण मूळ व्हीप जो सादर केला त्यापूर्वी त्या व्हिपचा ताबा कोणाकडे होता?

प्रभू – मूळ व्हीप म्हणजे कोणता व्हीप मला कळलं नाही? मी यासंदर्भातील कागदपत्र पक्षाच्या कार्यालयात ज्या जागेवर ठेवतो, त्या ठिकाणी हे सगळे ठेवले होते (विधान सभेच्या पक्ष कार्यालयात नाही)

जेठमलानी – 20 तारखेला झालेल्या निवडणुकांमध्ये सगळ्या आमदारांनी मतदान केलं होतं का?

प्रभू – हो सगळ्यांनी मतदान केलं

जेठमलानी – जर सगळ्यांनी मतदान केलं तर कोण मिसिंग होतं आणि कधीपासून ते मिसिंग झाले?

प्रभू – शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मतदान केलं. याची पडताळणी करण्यासाठी तुम्ही विधानसभेच्या पटलावरचे रेकॉर्ड मागवू शकता.

महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभूंच्या उत्तरांवर आक्षेप घेतला.

जेठमलानी – प्रभू वेळ वाया घालवत आहेत. मी मुद्दाम विचारलेल्या प्रश्नांची गोल-गोल ऊत्तरे देत आहेत. माझा यावर आक्षेप आहे

(जेठमलानी यांनी माझं मत रेकामर्डवर घ्यावं, अशी विनंती अध्यक्षांना केली. त्यानंतर जेठमलानी यांचं स्टेटमेंट रेकॉर्डवर घेण्यात आलं)

प्रभू – अध्यक्ष मोहोदय हे खरं नाहीये

जेठमलानी – उद्धव ठाकरे यांनी सूचना केल्यानंतर व्हीप बजावण्यात आलेले डॉक्युमेंट हेच आहेत का ?

प्रभू – उद्धव ठाकरे यांनी आमदार मिसिंग असल्याचे कळताच बैठकीसाठी बोलविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मी हा व्हीप सर्व आमदारांना बजावला होता.

जेठमलानी – 20 जूनला झालेल्या सर्व शिवसेना पक्षाच्या आमदारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान केले होते का?

प्रभू – सर्व शिवसेना आमदारांनी मतदान केले होते

जेठमलानी – जर 20 जूनला सर्व शिवसेना विधानसभा आमदारांनी विधानपरिषद निवडणुकीत मतदान केले तर ते कोणते आमदार मिसिंग होते असं तुम्ही म्हणताय?

प्रभू – सर्व शिवसेना आमादारांनी मतदान केले होते. हे जर चेक करायचं असेल तर विधानभवनाच्या पटलावर हे दिसून येईल. विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर वृत्तवाहिन्यांवर बातम्या येत होत्या की शिवसेनेचे काही आमदार मिसिंग आहेत. त्यानंतर संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर बऱ्याच आमदारांचे फोन बंद होते. त्यानंतर सातत्याने मीडियामध्ये हे आमदार गुजरात दिशेने गेल्याच्या बातम्या येत होत्या

जेठमलानी – मी स्पेसिफिक विचारत आहे की कुठले आमदार मिसिंग होते? हे सगळं सांगायची गरज नाही.

प्रभू – मला समोरून एवढे प्रश्न विचारले जातात की त्याचं मला संक्षिप्त उत्तर द्यावं लागत आहे.

विधानसभा अध्यक्ष – तुम्ही स्पेसिफिक बोलत नाहीत

प्रभू – मला संरक्षण द्या, समोरून ऊलट प्रश्न येत आहेत मी काय करू? तुम्ही म्हणाल तर मी हो किंवा नाहीमध्ये ऊत्तर देतो.

अध्यक्ष – तुम्ही प्रभू आम्हाला सांगा की मिसिंग झालेले आमदार कोण होते? असा प्रश्न त्यांनी विचारला. तुम्ही म्हणताय की आमदार मिसिंगच्या बातम्या कानावर येत होत्या.

प्रभू – मी ज्यांना हातोहात व्हीप द्यायला लावले जे मुंबईत उपस्थित होते. ज्यांचे फोन लागत नव्हते ते मिसिंग होते. त्यांना व्हीप पाठविणे आवश्यक होते. रात्रीपासून ते बैठकीपर्यत मी व्हीप देण्याचा प्रयत्न करत होतो.

अध्यक्ष – कामत आपले आमदार खूप मोठे उत्तर देत आहेत, ज्याचा मूळ प्रश्नांशी संबंध येत नाही. त्यांनी जर स्पेसिफिक उत्तर दिली तर वेळ जास्त लागणार नाही.

प्रभू – जर मला समोरचे वकील इतके उपप्रश्न विचारात असतील तर मला संक्षिप्त उत्तरे द्यावे लागतील. त्यामुळे यातून मला संरक्षण द्या! त्यांनी एवढे उपप्रश्न केले आहेत, त्यामुळे मला असे उत्तर द्यावी लागणार

विधानसभा अध्यक्ष – ज्या पद्धतीने कारवाई सुरू आहे, मला वाटत नाही पुढच्या 16 दिवसातही आपण सुनावणी पुर्ण करू शकू. जे विटनेस आहेत ते फीरून-फिरून ऊत्तरे देत असतील तर कारवाई कशी पूर्ण करणार?

Follow Us
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?