
मुंबई | दि. 2 मार्च 2024 : महाराष्ट्र विधिमंडळाच्या आवारात काल सत्ताधारी शिंदे गटातील खदखद बाहेर आली होती. शिंदे गटाचे दोन आमदार महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यात विधिमंडळाच्या आवारात शाब्दीक वादावादी झाली होती. त्याशिवाय TV 9 मराठीच्या लोकसभेचा रणसंग्राम कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महत्त्वाच विधान केलं होतं. महायुतीच्या जागावाटपात बारामतीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली तर सुनेत्रा पवारच आमच्या लोकसभेच्या उमेदवार असतील, असं त्यांनी विधान केलं होतं. दरम्यान आज बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर नमो महारोजगार मेळावा होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच मंचावर येणार आहेत. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
कल्याण : कल्याण पूर्वेत भाजपच्या बॅनरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे नेते गायब आहेत. विकास कामाच्या बॅनरवर भाजपच्या नेत्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरिल वाहतूक कोंडीने वाहनधारक हैराण झाले आहेत. महार्गावर सिमेंट काँक्रीटचे काम सुरू असल्याने मागच्या एक महिन्यापासून सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. विरार खाणिवडे टोल नाका ते वसई हद्दीत वर्सोवा ब्रीज अशी २५ किलोमीटर ही वाहतूक कोंडी होत आहे. अतिशय धिम्या गतीने वाहतूक सुरु आहे. सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. या वाहतूक कोंडीचा परीक्षार्थी विधार्थी, पालघर जिल्ह्यातून मुंबईला रुग्ण घेवून जाणाऱ्या रुग्णवाहिका यांना याचा मोठा फटका बसत आहे. तासंतास वाहन वाहतूक कोंडीत अडकत असल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत. आता या वाहतूक कोंडी कधी दिलासा मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निधीची कमतरता पडू दिली नाही. आता स्मारक लवकर पूर्ण होईल. स्मारक मंजूर करण्यात तिन्ही नेत्यांचा हात, स्मारकात अनेक उपक्रम राबविण्यात येतील. समाजाच्या हितासाठी सरकार काम करत आहेत. आर्टीची घोषणा आपल्या सरकारने केली आहे. मातंग समाजासाठी हा ऐतिहासिक निर्णय असेल. आरक्षण मिळाल पण समाज वर आला नाही समाजातल्या नेत्यांना विंनती करतो की यासाठी आपण काम करू असं भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
भाजप मुख्यालयातील लगबग वाढली आहे. थोड्याच वेळात भाजपची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. संपूर्ण देशातल्या भाजप कार्यकर्त्यांचे यादीकडे लक्ष लागलं आहे. कोणाचा पत्ता कटणार कोण नवीन उमेदवार? राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
ते खरोखर रोजगार देणार असतील तर आम्ही त्यांच्याविषयी बोलु, आज संध्याकाळ पर्यंत बघु किती नोकऱ्या ते देतात. फक्त रोजगार मेळावे भरवले जातात नोकऱ्या दिल्या जातं नाही. प्लेसमेंट एजन्सी तुम्ही लावल्या त्याचे पैसे कोणी दिले, बेरोजगार झालेल्या सरकारचे बेरोजगार मेळावे आहेत. शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्र झाला भिकारी म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे.
अमरावती लोकसभेची जागा ही शिवसेनेची आहे त्यामुळे मी जागा लढणार. नवनीत राणा यांना वाटेल ते बोलायची सवय आहेत ते आम्हाला नाही जमत. जे आहे ते होणार ते चांगलं बोलतो. अमरावती लोकसभा ही जागा भाजप ची नव्हती, ही जागा शिवसेनेची आहे, नवनीत राणा या बीजेपी मध्ये जरी गेल्या तरी त्यांना ही जागा मिळणार का? आम्ही आमचा क्लेम सोडणार नाही आम्ही कुठल्याही परिस्थितीत लढणार असल्याचं आनंदराव अडसूळ यांनी म्हटलं आहे.
गुगलने हे ॲप प्ले स्टोअरवरून काढून टाकल्याने सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, ॲप हटवण्याची परवानगी दिली जाणार नाही.
बंगळुरू कॅफे स्फोटावर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, ही गंभीर बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना, विशेषत: उपमुख्यमंत्र्यांना सांगावे की, हा सिलिंडरचा स्फोट आहे, असे सांगून ते दाबण्याचा प्रयत्न करू नका.
औरंगाबादमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभेला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित होते. मुख्यमंत्री पीएम मोदींच्या समोरच मंचावरून म्हणाले की, आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की आता आम्ही इकडे तिकडे जाणार नाही, आम्ही नेहमीच तुमच्यासोबत राहू. मध्येच गायब झालो होतो, आता कुठे जाणार नाही.
बिहारच्या औरंगाबादमध्ये एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, इथे पुन्हा एकदा डबल इंजिन सरकारला वेग आला आहे. बिहारमध्ये कुटुंबाधारित राजकारण उपेक्षित झाले आहे. आता ज्याने बिहार लुटला त्याची झोप उडाली आहे. बिहारमध्ये आज उत्साह आणि आत्मविश्वास आहे.
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील रामसू येथील हिग्नीजवळ NH 44 वर भूस्खलन झाल्यामुळे रस्ता बंद झाला आहे. केंद्रशासित प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून बर्फवृष्टी होत असून त्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो की मग अडसूळ पिता पुत्र असो हे येत्या निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांचा प्रचार करतील ही काळ्या दगडावरील रेष आहे. आनंदराव अडसूळ दोन वेळा अमरावती मधून खासदार होते. आता त्यांचे वय झालं आहे. निवडणुकीमध्ये नवनीत राणांच्या विजयासाठी कसं काम केलं पाहिजे याचं मार्गदर्शन ते कार्यकर्त्यांना करतील. आजपर्यंत जे जे बोललो ते ते खरं झालं आहे. असं रवी राणा यांनी म्हटले आहे.
बारामतीतील मुलांच्या हाताला काम देण्यासाठी सरकार जे जे पाऊल उचलेल त्यासाठी आमची मदत राहील असे खासदार शरद पवार यांनी यावेळी म्हटले आहे. राज्य सरकारने अजित पवार महायुतीत सामील झाल्यानंतर बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित आहेत यावेळी व्यासपीठावर शरद पवार यांचे नाव सत्कारासाठी पुकारल्यावर विद्यार्थी वर्गातून मोठ्याप्रमाणात हुंकार भरत टाळ्या वाजवण्यात आल्याचे दृश्य दिसले
बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित आहेत.
नितिन गडकरी भाजपचे असेट आहे. मोदी सरकारमध्ये महत्वाचे स्थान गडकरी यांचे आहे. आमच्या पक्षात असंतोष होईल असा प्रयत्न काँग्रेस करते आम्ही त्यांना लीगल नोटीस दिल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
सांगली शहरातील दूषित पाणी पुरवठयाच्या पार्श्वभूमीवर खासदार संजयकाका पाटील यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. खासदार पाटील यांनी थेट पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट देत पाणी शुद्धीकरण यंत्रणेची पाहणी केली. आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं.
सहानुभूती वगेरे काही नाही. जनता ठरवेल काय करायचे ते असा पलटवार त्यांनी केला. या मतदारसंघात ५ लाख मतं ही पवार विरोधी होती आता अजित पवार सोबत आले आहेत, असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि जागा वाटपाचा तिढा सुटण्यापूर्वीच मुंबईच्या मातोश्री बाहेर महायुतीने बॅनरबाजी केली. बांद्रा ते एअरपोर्ट परिसरामध्ये महायुतीचे बॅनर झळकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मातोश्री बाहेर बॅनर, मुंबई महायुतीचीच असा आशय असणारा हा बॅनर मातोश्री परिसरामध्ये सगळ्यांचे लक्ष वेधतोय.मुंबईमध्ये लोकसभेच्या सहा जागा आहेत… त्यापैकी तीन जागेवर शिवसेनेचे खासदार आहेत मात्र यंदा महायुतीचा बॅनर लावून या सर्व जागांवर आपलेच खासदार निवडून येतील असा विश्वास या बॅनरच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.
गौतम गंभीर सध्या राजधानी दिल्लीतील खासदार आहे. राजकारणातून बाहेर पडणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना गौतम गंभीर यांनी पत्र लिहिले आहे.
नवी मुबईच्या एपीएमसी बाजारात लिंबाच्या भावात वाढ… गेल्या काही दिवसांमध्ये लिंबूचे भाव दुप्पट झाले आहेत… आवक कमी असल्यामुळे भाव वाढ झाली असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे
संजय राऊत यांनी दावा केल्यानंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘शिंदे गट धनुष्यबाणावर तर अजितदादा गट घड्याळावरच लढणार…’
सिंचन आणि शिखर घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावं… फडणवीसांकडे उत्तर नसेल तर नड्डा, शाह, मोदींनी उत्तर द्यावं… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
अजित पवारांकडून बारामतीच्या बसस्थानकाला भेट देत पाहाणी केली आहे. 50 कोटी रूपये खर्च करून हे बसस्थानक उभारण्यात आले आहे.
बारामतीमध्ये होणार असलेल्या महारोजगार मेळाव्यासाठी शरद पवार त्यांच्या निवासस्थानावरून रवाना झालेले आहेत. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार आज एकाच मंचावर येणार आहेत.
बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अजित पवारांकडून विकास कामांचा आढावा घेण्यात येत आहे.
साताऱ्यामध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांचे उपोषण तीसऱ्या दिवशीही सुरूच आहे. विक्रम बाबा पाटणकर यांची उपोषणस्थळाला भेट
चांदवडमधील राष्ट्रीय महामार्गावरील बेकादेशीर मजारीवर कारवाई करण्यात आली आहे. नितेश राणे मजारीच्या मुद्यावरून अधिवेशनात आक्रमक झाले होते.
यवतमाळच्या पाटणबोरी केंद्रावर 10 वीचा मराठीचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रावरील पर्यवेक्षक, कर्मचारी, लिपीकाकडे पोलीस चौकशी करत आहेत.
तळ कोकणातील प्रसिद्ध अशा अंगणेवाडी जत्रेला सुरूवात झालेली आहे. लाखोंच्या संख्येने भाविक भराडी देवीच्या दर्शनाला आलेले आहेत. मुख्यमंत्री शिंदे देखील दर्शनाला येणार आहेत.
नागपुरात सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. विदर्भाच्या काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे. काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली. त्यामुळे गर्मी सुरू झाली. मात्र आता पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने नागपूरकर पावसाळी वातावरण अनुभवत आहेत.
अहमदनगरला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांची ठाकरे गटाचे शहरप्रमुख आणि काही नगरसेवकांनी भेट घेतली. यावेळी निलेश लंके यांना महाविकास आघाडीत येऊन लोकसभा लढवावी, असा ठाकरे गटाच्या नगसेवकांनी आग्रह धरला. लंके यांनी महाविकास आघाडीत येऊन तुतारी किंवा स्मशाल हातात घ्यावी, अशी या नगरसेवकांची इच्छा आहे.
हिंगोलीत कोट्यवधी रुपयांची एफआरफी आणि इतर रक्कमा थकल्याने टोकाई सहकारी साखर कारखाना विक्रीला सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अँड. शिवाजीराव जाधव या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार कारखाना विक्रीची प्रक्रिया सुरू आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरात कारखाना आहे.
मिस वर्ल्डच्या स्पर्धकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतीभवनला भेट दिली. रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतलं. मिस वर्ल्डच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेयर करण्यात आलीय. भारतात होत असलेल्या 71 वी मिस वर्ल्ड स्पर्धेचे 9 मार्च रोजी ग्रँड फिनाले आहे. त्यापूर्वी हे स्पर्धक भारतातील महत्वाच्या ठिकाणी जात असून भेट देत आहे. 28 वर्षानंतर 71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा स्पर्धा भारतात होत आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या वतीने डीप क्लिनिंग ड्राईव्ह उपक्रम राबवण्यात येत आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगर पालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या उपस्थितीत स्वच्छ्ता मोहीम राबवण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा सिंधुदुर्ग दौरा असल्याने ते या उपक्रमात सहभागी होऊ शकलेले नाहीत.
येत्या बुधवारी पुणे शहरातील मुख्य भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद. मुख्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी दक्षिण पुण्यातील पाणीपुरवठा 6 मार्च रोजी राहणार बंद. तर 7 मार्चला देखील शहरातील अनेक भागात कमी दाबाने होणार पाणीपुरवठा. शहरातील कोंढवा, स्वारगेट हडपसर, कात्रज या परिसरातील पाणीपुरवठा राहणार बंद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात आंगणेवाडीत येणार. भराडी देवीच्या यात्रोत्सवात देवीचे दर्शन घेणार. मुख्यमंत्री यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री उदय सामंत हे ही देवीचे दर्शन घेणार.
बारामती नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने बॅनरबाजी. तिन्ही पक्षाचे चिन्ह असलेले झेंडे बारामतीत झळकले. आज विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर मेळाव्याच आयोजन. चौकाचौकात बॅनरबाजी करण्यात आली आहे. महारोजगार मेळावामध्ये 200 कंपन्यांच्या माध्यमातून 20 हजार पदांची भरती होणार. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधून भरती केली जाणार.
आज बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर नमो महारोजगार मेळावा होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत.