Maharashtra Day 2021 | मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा, सर्वपक्षीय नेत्यांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

कोरोना संकटामुळे महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Day 2021 Politicians wishes)

Maharashtra Day 2021 | मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा, सर्वपक्षीय नेत्यांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
Maharashtra Day 2021
| Updated on: May 01, 2021 | 8:38 AM

मुंबई : आज 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन. संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा आणि मोठ्या उत्साहात साजरा करता येणारा दिवस म्हणजे 1 मे. यंदा राज्याच्या स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य अस्तित्वास आलं. यानिमित्ताने राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. (Maharashtra Day 2021 Politicians wishes)

महाराष्ट्रातील कोरोना संकटाचे भान ठेवून यंदा 1 मे २०२१ रोजी महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन राज्य शासनाने नागरिकांना केले आहे. गेल्या वर्षीही कोरोना संकटामुळे महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्यात आला होता. यंदा राज्याच्या स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन आहे. पण कोरोना संकटामुळे महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वपक्षीय नेत्यांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

(Maharashtra Day 2021 Politicians wishes)

संबंधित बातम्या : 

International Labor Day 2021 : जाणून घ्या 1 मे रोजी ‘कामगार दिवस’ का साजरा केला जातो?