पोलीस महासंचालकांना दुसऱ्यांदा मुदतवाढ?

पोलीस महासंचालकांना दुसऱ्यांदा मुदतवाढ?

मुंबई: राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वीही त्यांना तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदतवाढ उद्या संपत आहे. मात्र, नव्या पोलीस महासंचालकाच्या नियुक्तीबाबत कोणतीही हालचाल नसल्याने, आता पडसलगीकर यांनाच पुन्हा तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून समजतंय.

राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर हे 31 ऑगस्ट 2018 रोजी निवृत्त झाले होते. मात्र, ऐनवेळी त्यांना तीन महिन्याची मुदवाढ देण्यात आली होती. ही मुदतवाढ 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत होती. म्हणजेच आज 30 नोव्हेंबर 2018 रोजी ते निवृत्त होत आहेत. मात्र, त्यांच्या जागी नव्या पोलीस महासंचालकांची नियुक्ती घोषित करण्यात आलेली नाही.

महत्वाचं म्हणजे पडसलगीकर यांच्यानंतर सेवा ज्येष्ठतेत  मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोशकुमार जयस्वाल आहेत. त्यामुळे जयस्वाल यांची नियुक्ती पोलीस महासंचालक म्हणून व्हायला हवी. मात्र, कोणत्याच नियुक्तीबाबत राज्य सरकारने आदेश काढले नसल्याने, पुन्हा पडसलगीकर यांना तीन महिन्यांनी मुदतवाढ मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI