AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Din : आता मेट्रोची अनोखी व्हॉट्सअ‍ॅप ‘चौकशी खिडकी’, मोबाईलवरून चॅटींगद्वारे मदत मागा

मुंबई मेट्रोवन प्रशासनाने महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर मुंबईकरांसाठी कस्टमर केअर सेवा प्रथमच मोबाईलवरच उपलब्ध केली आहे, काय आहे ही सेवा...

Maharashtra Din : आता मेट्रोची अनोखी व्हॉट्सअ‍ॅप 'चौकशी खिडकी', मोबाईलवरून चॅटींगद्वारे मदत मागा
Metro-LinesImage Credit source: socialmedia
| Updated on: May 01, 2023 | 5:36 PM
Share

मुंबई : घाटकोपर ते वर्सोवा धावणाऱ्या मुंबई मेट्रो वन ( Mumbai metro one ) आता महाराष्ट्र दिनाच्या शूभमुहूर्तावर एक प्रवाशांच्यासाठी महत्वाची सेवा सुरू केली आहे. मुंबईची पहिली मेट्रो असलेल्या मुंबई मेट्रो वनने व्हॉट्सअ‍ॅपवर मेट्रोची तिकीट देण्याची सुविधा गेल्यावर्षी सुरू केली होती. आता महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर व्हॉट्सअ‍ॅपवर ‘चौकशी खिडकी’ सुरू होणार आहे. म्हणजे मुंबई मेट्रो वनने त्यांची क्वीक रिस्पॉन्स कस्टमर केअर ( customercare ) सेवा आता व्हॉट्सअ‍ॅपवर  ( whatsapp app )  सुरू केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मेट्रो सेवेबाबत कोणतीही तक्रार करायची किंवा चौकशी करायची असेल तर आपल्या मोबाईल फोनवरून अगदी झटपट करता येणार आहे.

मुंबई मेट्रो वनचं संचलन रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर करीत आहे. घाटकोपर ते वर्सोवा मार्ग सुरू झाल्यापासूनच मुंबईकर प्रवाशांसाठी कस्टमर केअर केंद्रे सर्व स्थानकांवर स्थापन केली आहेत. तसेच प्रवाशांच्या मदतीसाठी 022-30310900 हा कॉल सेंटर क्रमांक जारी करण्यात आला आहे. तसेच तक्रारी घेण्यासाठी मेट्रो प्रशासनाने  customercare@reliancemumbaimetro.com या ईमेल आयडी तसेच सोशल मिडीयावर ट्वीटर खात्यावर ही तक्रार करता येत आहेत.

आता मुंबई मेट्रोवन प्रशासनाने महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर मुंबईकर प्रवाशांसाठी आपली कस्टमर केअर सेवा प्रथमच प्रवाशांच्या मोबाईलवरच मिळण्यासाठी आपला व्हॉट्सअप कस्टमर केअर क्रमांक जाहीर केला आहे. मुंबईकरांना आता आपल्या मोबाईलवरून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज चौकशी क्रमांक 9930310900 वर संदेश पाठवून आपल्या तक्रारी आणि चौकशी करता येणार आहे.

असे करा मोबाईलवर डाऊनलोड

आता मुंबईकरांना चौकशी क्रमांक 9930310900 वर व्हॉट्सअ‍ॅप पाठवून चौकशी करता येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रो वन प्रशासनाने मेट्रोच्या सर्व स्थानकांवर कस्टमर केअर काऊंटर जवळ कस्टमर केअरचे क्यूआर कोड चिकटविण्यात आले आहेत. हे क्यूआर कोड स्कॅन करून मोबाईलवरून प्रवाशांना मुंबई मेट्रो वन व्हॉट्सअ‍ॅप पेजवर सहज पोहचता येणार आहे. 9930310900 हा मोबाईल कस्टमर केअर क्रमांक कॉल सेंटर क्रमांकाशी मिळता जुळता ठेवण्यात आल्याने प्रवाशांना तो सहज लक्षात ठेवता येण्या जोगा केलेला आहे. मुंबई मेट्रो वन प्रशासनाने प्रवाशांच्या चौकशी आणि सूचनांचे झटपट निराकरण करण्यासाठी ही आधुनिक सोय उभारली आहे.

अशी मिळणार मदत

या मोबाईल कस्टमर केअर क्रमांक  9930310900 वर आपण  HI असा मॅसेज पाठवताच कॉलसेंटरवरील कर्मचारी तातडीने तुम्हाला प्रतिसाद देतील तुम्हाला काय मदत हवी अशी मॅसेज पाठवून चौकशी करतील आणि तुमच्या तक्रारींचे निराकरण करतील अशी ही सुविधा असणार आहे, ही व्हॉट्सअ‍ॅप कस्टमर केअर सुविधा सकाळी 7. 6:30 ते रात्री 10:30 पर्यंत उपलब्ध असणार आहे. सर्व तक्रारींचा निपटारा 72 तासांच्या आत करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मेट्रो वन प्रशासनाने दिली आहे. प्रवासी त्यांचा सेवेबद्दलचा प्रतिसाद देखील देऊ शकतात. तसेच चौकशी किंवा सूचना देखील करू शकणार आहेत.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.