
Floods Victims are in big Trouble : अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांचा शेतकऱ्यांना अनुभव येत आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं सर्वच हिरावलं आहे. जमीन खरडून वाहून गेली आहे. तर उभं पिकं सडलं आहे. शेताला तळ्या स्वरुप आले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेला आहे. पंचनामे, मदतीसाठी निकषांची लांबलचक जंत्री, तुटपुंजी मदत यावरून शेतकरी नाडला जात असतानाच आता मदत कीटवरून ही वाद समोर आला आहे. मदत कीटमध्ये केवळ गहू,तांदळासह तुरीच्या डाळीचाच पुरवठा केला जात आहे. पण त्यात इतर जीवनावश्यक वस्तू नसल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.
पूरग्रस्तांसाठी धान्य मदत
पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासाने सध्या 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ यासह 3 किलो तूरडाळ देण्याचे आदेश दिले आहेत. अन्नधान्य वाटपाचे काम सुर झाले आहे. काही भागात तूरडाळ अद्याप पोहचलेली नाही. तर या कीटमध्ये तेल, मीठ, साखर, चहा आणि स्वयंपाकाची भांडी देण्याचं आश्वासन देण्यात आले असताना या वस्तू मात्र कीटमधून गायब झाल्या आहेत. काही ठिकाणी स्वयंसेवी संस्था मदतीला धावल्या आहेत. त्यांनी काही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. पण सरकारकडून या वस्तू मिळणं अपेक्षित असताना शेतकरी उपेक्षित असल्याचे दिसत आहे. त्यावरून नाराजी व्यक्त होत आहे.
पूरग्रस्तांच्या खात्यात 10 हजारांची मदत
अनेक गावात पुराचे पाणी शिरले आहे. अशा बाधित घरांचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे, त्या पुरग्रस्तांच्या खात्यात उद्या 1 ऑक्टोबरपासून प्रत्येकी 10 हजारांची मदत देण्यात येणार आहे. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तर पूरग्रस्तांसाठी 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू देण्यात येत आहे. तर तूर डाळ स्थानिक ठिकाणाहून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पण या कीटमध्ये इतर जीवनावश्यक जीन्नस नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
चारा टंचाईचा प्रश्न
अनेक गावात चारा टंचाईचा प्रश्न अजून सुटलेला नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पूराचा फटका बसला आहे. त्यामुळे चारा आणणार कुठून असा प्रश्न पडला आहे. तरीही काही जिल्ह्यांमधून चारा आणण्यात येत आहे. ज्या भागांना पूराचा फटका बसलेला नाही अशा ठिकाणचा चारा आणण्यात येत आहे.
रेशनकार्ड धारकांची तारांबळ?
रेशनकार्ड धारकांचे धान्य सध्या पूरग्रस्तांकडे वळवण्यात आले आहेत. ऐन दिवाळीअगोदर निसर्ग शेतकऱ्यांचीच नाही तर सरकारची परीक्षा पाहत आहे. सरकारसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. राज्यातील अनेक मंडळांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीने या भागात मोठे नुकसान झाले आहेत. या भागात सरकार अन्नधान्याचा पुरवठा करत आहे. पण यामुळे रेशनधारकांना दिवाळीपूर्वीत रेशन पुरवठा करण्याचे आवाहनही प्रशासनासमोर उभं ठाकलं आहे.